मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Best Career Option: मुलींनो काही तरी हटके करिअर पर्याय शोधताय? बनू शकता रेफरी!

Best Career Option: मुलींनो काही तरी हटके करिअर पर्याय शोधताय? बनू शकता रेफरी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 06, 2024 12:54 PM IST

Pro Kabaddi League: सध्या सुरु असलेल्या प्रो कबड्डी लीगमध्ये आरती बारी या महिला रेफरी काम करताना दिसत आहेत. त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात या करिअर पर्यायांबद्दल..

women referee career
women referee career

Career Tips for Women: आपल्या समाजातील बहुतांश महिला मुली या टिपिकल ठरलेले करिअर पर्याय निवडताना दिसतात. पण अशाही काही महिला असतात ज्या हटके करिअरचा पर्याय शोधतात. असाच एक पर्याय म्हणजे रेफरी. जे लोक स्पोर्ट्सशी निगडित आहेत किंवा ज्यांना स्पोर्ट्स बघायची खेळाची आवड आहे त्यांना रेफरी (women referee career) म्हणजे काय हे माहीतच असेल. अंपायर किंवा रेफरी हे एक हाय-प्रोफाइल काम आहे. यांच्यामुळे कोणतीही चूक किंवा घटना खेळ किंवा शर्यतीचा निकाल बदलू शकते. मैदानावर, संघर्षाच्या बाबतीत रेफरीचा अंतिम निर्णय असतो. पंच हा खेळातील महत्त्वाचा व्यक्ती आहे, त्याच्याशिवाय खेळ सुरळीत चालू शकत नाही. रेफरी ही अशी व्यक्ती आहे जी सर्व क्रीडा स्पर्धांवर नियंत्रण ठेवते. अशीच एक महिला रेफरी सध्या चर्चेत आहे. आरती बारी या भारतात सुरु असलेल्या प्रो प्रो कबड्डी लीगमध्ये महिला रेफरी काम करताना दिसल्या. टिपिकल चौकट मोडून आरती बारी यांनी आपलं स्वप्न कसं पूर्ण केलं याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. याशिवाय महिला रेफरी कसं करिअर करता येईल याबद्दलही जाणून घेऊयात.

अशी झाली सुरुवात

१९९२ पासून आरती या कबड्डी खेळत आहेत. भावंडाना बघून त्यांना या खेळाबद्दल आकर्षण वाटलं. शाळेत खूप रिक्वेस्ट करून कबड्डीचा खेळ सुरु केला. हळू हळू एक एक मुली जोडून त्यांनी टीम बनवली. तेव्हापासून त्यांनी अनेक मॅचेस खेळल्या. एका वेळा नंतर खेळ थांबतो. पण या मातीशी जोडून राहण्यासाठी आपण काय करावं हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. तेव्हा त्यांनी रेफरीची परीक्षा दिली. त्या आधी त्यांनी गुणसंख्या लिहण्याचे कामही केलं. खूप मेहनती नंतर पुढच्या परीक्षा देतात येतात. २०१५ साली मला प्रो कबड्डीची संधी आरतीला आली. मी ऑडिशन दिली आणि मी सिलेक्ट झाले.

रेफरी होण्यासाठी कोणती कौशल्ये आणि गुण आवश्यक आहेत?

संवाद कौशल्ये

रेफरी म्हणून करिअरमध्ये, एखाद्या व्यक्तीला इतर खेळ अधिकारी आणि सहभागींशी संवाद साधण्याची आवश्यकता असते. क्रिकेटमध्ये, खेळाडूंना खेळाच्या नियमांची माहिती देण्याची जबाबदारी रेफरीची असते. रेफरी प्रत्येक गोष्टीवर चर्चा करतात आणि विवाद सोडवतात, त्यामुळे त्यांच्या व्यवसायात संवाद कौशल्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

निर्णय घेण्याची कौशल्ये

विविध परिस्थितींचे मूल्यांकन करण्यासाठी आणि फेअर निर्णय घेण्यासाठी चांगल्या निरीक्षणाची आवश्यकता असते.

व्हिजन

रेफरीची नजर योग्य असणे गरजेचे आहे. खेळात घडणारी प्रत्येक घटना नीट तपासून घेणे महत्त्वाचे आहे.

शारीरिक ताकद

रेफरीकडे शारीरिक तंदुरुस्ती असणे आवश्यक आहे कारण त्याच्या कारकीर्दीत क्रीडा स्पर्धांमध्ये दीर्घकाळ उभे राहणे, चालणे, धावणे आणि बसणे आवश्यक आहे.

 

WhatsApp channel