Blood Pressure : वयानुसार किती ब्लड प्रेशर असणं आरोग्यासाठी चांगलं? जाणून घ्या सविस्तर-know normal or healthy blood pressure range by age ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Blood Pressure : वयानुसार किती ब्लड प्रेशर असणं आरोग्यासाठी चांगलं? जाणून घ्या सविस्तर

Blood Pressure : वयानुसार किती ब्लड प्रेशर असणं आरोग्यासाठी चांगलं? जाणून घ्या सविस्तर

Aug 09, 2024 05:15 PM IST

Normal Blood Pressure: वयानुसार महिला आणि पुरुषांसाठी किती रक्तदाब हेल्दी असते हे तुम्हाला माहीत आहे का? डॉ. सरीन यांनी दीर्घकाळ जगण्यासाठी रक्तदाब किती असावा हे सांगितले आहे.

वयानुसार हेल्दी ब्लड प्रेशर रेंज
वयानुसार हेल्दी ब्लड प्रेशर रेंज

Healthy Blood Pressure Range By Age: रक्तदाब हा जीवनशैलीशी निगडित आजार आहे. ज्याचा थेट संबंध कोलेस्टेरॉल आणि हृदयाच्या कार्याशी असतो. कोलेस्टेरॉल आणि हृदय व्यवस्थित काम करत नसल्याचं पहिलं लक्षण हाय बीपीच्या माध्यमातून दिसून येतं. म्हणूनच, रक्तदाबाची किती रेंज निरोगी आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. वयानुसार ही रेंज बदलते. जाणून घ्या वयाच्या १८ ते ६० व्या वर्षी निरोगी राहण्यासाठी किती रक्तदाब आवश्यक आहे.

जाणून घ्या वयानुसार किती ब्लड प्रेशर आहे हेल्दी

- १८ ते ३९ वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये ११९/७० मिमी आणि स्त्रियांमध्ये ११०/६८ मिमी निरोगी मानले जाते.

- तर ४० ते ५६ वयोगटात १२४/७७ मिमी आणि महिलांमध्ये १२२ ते ७४ निरोगी रक्तदाब असतो.

- त्याचबरोबर ६० वर्षांवरील सर्व पुरुषांचा रक्तदाब १३३/६९ इतका निरोगी असतो. तर महिलांमध्ये हा रेट १३९/६८ असतो.

रक्तदाबाची ही रेंज सामान्य मानली जाते आणि वयोगटानुसार अशी रक्तदाब रेंज असताना हृदय सहजपणे कार्य करत राहते.

डॉक्टरांनी सांगितली नॉर्मल ब्लड प्रेशरची रेंज

प्रसिद्ध यकृत डॉक्टर सरीन यांनी पॉडकास्टमध्ये हा अनुभव शेअर केला आणि सांगितले की, जर तुम्हाला दीर्घायुष्य जगायचे असेल आणि निरोगी राहायचे असेल तर तुमचा रक्तदाब १००/७० असावा. रक्तदाब ११० च्या वर जाऊ नये. हे आपल्या रक्तवाहिन्यांसाठी चांगले नाही. रक्तदाबाची एवढी रेंज आपल्या हृदयासाठी आरोग्यदायी आहे आणि रक्तदाबासारख्या समस्या उद्भवू देणार नाही.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग