Side Effects of Applying Kajal to New Borns Eyes: लहान मुलांचे डोळे सुंदर ठेवण्यासाठी काजल लावणे ही जुनी परंपरा आहे. असे मानले जाते की काजळ लावल्याने बाळांना नजर लागत नाही आणि डोळेही निरोगी राहतात. तुम्ही सुद्धा या मिथकांवर विश्वास ठेवता का? डॉक्टरांच्या मते, काजळ लावल्याने मुलांच्या डोळ्यांना गंभीर नुकसान होऊ शकते. बालरोगतज्ञ अर्पित गुप्ता यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून काजळ लावण्याच्या अशाच काही साइड इफेक्टबद्दल त्यांनी यात सांगितले आहे. डोळ्यात काजळ घातल्याने लहान मुलांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते ते जाणून घेऊया.
काजळ बनवण्यासाठी ५० टक्क्यांहून अधिक लेडचा वापर केला जातो, जो बाळाच्या डोळ्यांसाठी खूप धोकादायक असू शकतो. लेडचा परिणाम केवळ डोळेच नाही तर किडनी, मेंदू, अस्थिमज्जा आणि शरीराच्या इतर अवयवांवरही होतो. काही वेळा बाळाला काजळ लावल्याने डोळ्यात जळजळ होऊ शकते. त्यांना खाज सुटणे आणि जळजळ होऊ शकते.
जेव्हा काजळ लहान मुलांच्या डोळ्यांना बोटाने लावले जाते तेव्हा मुलांच्या डोळ्यांमध्ये संसर्ग होण्याचा धोका वाढतो. बोटाने काजळ लावताना अनेक वेळा लहान मुलांच्या डोळ्याला दुखापत होऊ शकते.
डोळ्यांना काजळ लावल्याने काही वेळा लहान मुलांमध्ये एलर्जी होऊ शकते. त्यामुळे खाज सुटू शकते. डोळ्यातून पाणीही वाहू लागते. काही वेळा मुलांच्या डोळ्यांच्या कोपऱ्यात काजल जमा होते. यामुळे मुलांमध्ये टियर डक्ट ब्लॉकेज आणि संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या