
World Environment Day 2023: आज जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी आज वेगवगेळे उपक्रम राबवले जात आहे. पण केवळ आजच्या दिवशी पर्यावरणाबद्दल जागृकता न दाखवता वर्षभर यावर काम केलं पाहिजे. हीच गरज समजून घेत केवळ १८ वर्षाच्या कोकणातल्या मेगल डिसूझा हिने वेगवगळे उपक्रम रावबण्यास सुरुवात केली. या तरुणीबद्दल आणि तिच्या कामाबद्दल 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'ने खास बातचीत करून जाणून घेतलं. चला जाणून घेऊयात या तरुणीचा पर्यावरणाबद्दल जनजागृती करणाऱ्या प्रवासाबद्दल…
मेगल डिसूझा ही नुकतीच १२वी उत्तीर्ण झाली आहे. ती कोकण, महाराष्ट्रातील किनारी मालवण परिसरात राहते. ती पर्यावरणविषयक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन पर्यायावरणासाठी काम करते. हवामान बदल हा तिचा आवडता विषय आहे. तिला सुरुवातीला तिला शालेय पाठ्यपुस्तके आणि ऑनलाइन माध्यमांद्वारे याबद्दल माहिती मिळाली. ती तरुणांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना शिक्षित करण्यासाठी हवामान जागृतीवर इंस्टाग्राम व्हिडीओ बनवते.
ती मालवणमध्ये एक स्थानिक तरुण गट चालवते. या ग्रुपसह ती स्वच्छता मोहीम आणि कचऱ्याचे पुनर्वापर अशा ऍक्टिव्हिटी करते. एवढंच नाही तर युनायटेड नेशन्ससमोर तिने दोनदा आपले काम मांडले आहे. ती शाळांमध्ये आणि विविध नागरिक गटांमध्ये जागरूकता आणि शिक्षणावर व्याख्याने, प्रेझेंटेशन देते. यासह पर्यावरण वाचवण्यासाठी विविध पायाभूत कामांमध्ये लोकांना सहभागी करून घेते.
संबंधित बातम्या
