मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Martyrs Day 2024 : महात्मा गांधीजींचे हे प्रेरणादायी विचार देतील आयुष्याला कलाटणी!

Martyrs Day 2024 : महात्मा गांधीजींचे हे प्रेरणादायी विचार देतील आयुष्याला कलाटणी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 30, 2024 10:04 AM IST

Mahatma Gandhi Death Anniversary : शहीद दिन २०२४ निमित्त जाणून घ्या महात्मा गांधींचे प्रेरणादायी कोट्स.

Mahatma Gandhi Death Anniversary 2024
Mahatma Gandhi Death Anniversary 2024

Inspirational quotes by Mahatma Gandhi: ३० जानेवारी रोजी भारतात शहीद दिन साजरा केला जातो. यामागचं कारण म्हणजे या दिवशी १९४८ मध्ये महात्मा गांधींची नथुराम गोडसेने हत्या केली होती. महात्मा गांधींनी स्वातंत्र्याच्या लढ्याचे नेतृत्व (Mahatma Gandhi Quotes) केले होते. यामुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटीश राजवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळाले. महात्मा गांधी अहिंसा आणि शांततापूर्ण पद्धतींद्वारे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले. यात त्यांनी सर्वात प्रमुख भूमिका बजावली. भारताच्या फाळणीबाबत गांधींच्या विचारांना विरोध करणाऱ्या नथुराम गोडसेने वयाच्या ७८ व्या वर्षी महात्मा गांधींवर नवी दिल्लीतील बिर्ला हाऊस कंपाऊंडमध्ये गोळ्या झाडल्या होत्या. या शहीद दिनानिमित्त, भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि तिन्ही सेना प्रमुख राजघाट येथील समाधीस्थळी एकत्र येतात, तेथे पुष्पहार अर्पण करतात तर देशभरात सकाळी ११ वाजता दोन मिनिटांचे मौन पाळले जाते. सर्व भारतीय शहीदांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतात.

जाणून घ्या हे प्रेरणादायी विचार

> माणूस आपल्या विचारांशिवाय काहीच नसून त्याचे विचार त्याला बनवतात.

> सामर्थ्य शारीरिक ताकदीतून येत नाही. हे इच्छाशक्तीतून येते.

> उपदेशापेक्षा थोडासा संयम सुद्धा चांगला आहे.

> स्वतः आधी तो बदल व्हा जो तुम्हाला इतरांमध्ये झालेला पहायचा आहे. - स्वतःला शोधण्याचा उत्तम मार्ग म्हणजे इतरांच्या सेवेत स्वतःला हरवणे.

> कोणताही भित्रा प्रेम करू शकत नाही; हे धैर्यवान व्यक्तीचे लक्षण आहे.

> सोने-चांदी नव्हे तर आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.

> आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, मग ते तुमच्यावर हसतील, मग ते तुमच्याशी लढतील आणि मग तुम्ही जिंकाल.

> करु किंवा मरु.

> अभिमान ध्येयासाठी झटण्यात आहे, ते गाठण्यात नाही.

> तुम्ही जे कराल ते नगण्य असेल. पण ते करणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.

> कोणाची मर्जी मानणे म्हणजे आपले स्वातंत्र्य विकणे होय.

> देवाला कोणताही धर्म नसतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel