मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Skin Care With Rose: त्वचेची काळजी घेण्यासाठी वापरा गुलाबाच्या पाकळ्या, रंगही उजळेल

Skin Care With Rose: त्वचेची काळजी घेण्यासाठी वापरा गुलाबाच्या पाकळ्या, रंगही उजळेल

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 06, 2024 12:22 PM IST

Rose Skin Care: गुलाबाच्या पाकळ्या स्किन केअरमध्ये वापरल्यास चेहऱ्याची त्वचा स्वच्छ, चमकदार आणि सुंदर बनते. तुमचे सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी गुलाबच्या पाकळ्या कसे वापरावे जाणून घ्या.

स्किन केअरसाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर
स्किन केअरसाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर (unsplash)

Rose Petals in Skin Care: सुंदर त्वचा मिळविण्यासाठी महिला आणि पुरुष वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. यासाठी अनेक वेळा स्किन केअर ट्रीटमेंट केली जाते. बहुतांश वेळा स्किन केअरमध्ये विविध केमिकल प्रोडक्ट वापरले जातात. परंतु काही वेळा यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत नैसर्गिक गोष्टींचा वापर करणे उत्तम असते. स्किन केअरमध्ये गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्यांचा वापर करता येतो. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होऊन त्वचा आणखी सुंदर होते. जाणून घ्या स्किन केअरमध्ये गुलाबाच्या पाकळ्या कशा वापराव्या.

डार्क सर्कल हाताळण्यासाठी

डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी तुम्ही गुलाबाचा वापर करू शकता. यासाठी गुलाबाच्या पाकळ्या दुधात मिक्स करा आणि नंतर त्या पाकळ्या डार्क सर्कलवर लावा.

गुलाब स्प्रे बनवा

सुंदर त्वचा मिळविण्यासाठी डेली रूटीनमध्ये गुलाब स्प्रे वापरा. ते बनवण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून उकळवा. ते थंड करा आणि स्प्रे बाटलीत भरा. नंतर चेहऱ्यावर लावा.

डाग होतील दूर

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही गुलाब आणि चंदनाचा फेस पॅक लावू शकता. यासाठी गुलाब चंदन पावडर आणि दुधात बारीक करून घट्ट पेस्ट बनवा. नंतर चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.

गुलाब फेस पॅक

तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी तुम्ही गुलाब स्क्रब ट्राय करू शकता. यासाठी गुलाब पावडरमध्ये साखर मिसळून स्क्रब बनवा. आता हे स्क्रब चेहरा आणि मानेवर लावा. नंतर चेहऱ्याला हलक्या हातांनी मसाज करा आणि काही वेळाने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

 

पोर्सची काळजी घेण्यासाठी

चेहऱ्यावरील पोर्सची काळजी घेण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून चेहऱ्यावर लावा. तुम्हाला हवे असल्यास या पाकळ्या दह्यात मिसळून चेहऱ्याला लावू शकता. याने तुमची त्वचा आणखी सुंदर दिसेल.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग