Pomegranate Peel for Skin Care: काही काळानंतर त्वचेला चांगली काळजी घेण्याची गरज असते. विशेषत: जेव्हा स्त्रिया ३० वर्षांच्या होतात, तेव्हा त्यांनी त्यांची स्किन केअर रूटीन बनवली पाहिजे. चांगल्या स्किन केअर रूटीनमध्ये विविध उत्पादनांचा समावेश असतो. पण जर तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही किटमध्ये काही गोष्टींचा समावेश करावा. यासह काही घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही बजेटमध्ये काम करू शकता. डाळिंब खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते, यासोबतच त्याची सालही वापरता येते. चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी डाळिंबाच्या सालीचा वापर करता येतो. तुमच्या स्किन केअरमध्ये डाळिंबाच्या सालीचा वापर कसा करावा ते येथे जाणून घ्या.
डाळिंबाची साल त्वचेवर वापरण्यासाठी प्रथम डाळिंबाची साल घेऊन ती नीट धुवून घ्यावी. नंतर ते चाळणीमध्ये ठेवा जेणेकरून त्याचे सर्व पाणी पूर्णपणे निघून जाईल. नंतर एका सुती कापडावर साली पसरवून चांगले वाळायला सोडा. तुम्ही उन्हात वाळवू शकता. जेव्हा ते चांगले कोरडे होतील, तेव्हा ते कडक होतील. नंतर मिक्सरमध्ये टाकून पावडर बनवा. आता तुम्ही घरगुती उपायांमध्ये या पावडरचा वापर करू शकता.
दीड चमचे दहीमध्ये एक चमचा पावडर मिसळा. हे चांगले मिक्स झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा. त्यानंतर १० मिनिटे राहू द्या. नंतर हात ओले करून चेहऱ्याची मसाज करत हे साफ करा.
चेहरा स्क्रब करण्यासाठी तुम्ही ओट्समध्ये ही पावडर मिक्स करू शकता. यासाठी ओट्स पावडर, डाळिंबाची साल पावडर, मध आणि दूध एकत्र मिसळावे. नंतर ते चेहऱ्यावर लावा आणि स्क्रब करा. मृत त्वचा काढून टाकण्यासाठी आणि डाग काढून टाकण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
डाळिंबाची साल गुलाब जलमध्ये मिसळून फेस पॅक बनवू शकता. हे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.
टीप- चेहऱ्यावर कोणतीही नवीन गोष्ट वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. काही रिअॅक्शन असल्यास ते वापरणे टाळा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या