मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Foot Care Tips: उन्हाळ्यात अशा प्रकारे घ्या पायांची काळजी, पाय नेहमी दिसतील गोरे

Foot Care Tips: उन्हाळ्यात अशा प्रकारे घ्या पायांची काळजी, पाय नेहमी दिसतील गोरे

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 21, 2024 09:37 PM IST

Summer Care Tips: उन्हाळ्यात पायांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. स्वच्छता राखली नाही तर टॅनिंगमुळे पाय काळे दिसू लागतात. अशा परिस्थितीत पाय स्वच्छ कसे ठेवावेत हे जाणून घ्या.

Foot Care Tips: उन्हाळ्यात अशा प्रकारे घ्या पायांची काळजी, पाय नेहमी दिसतील गोरे
Foot Care Tips: उन्हाळ्यात अशा प्रकारे घ्या पायांची काळजी, पाय नेहमी दिसतील गोरे (unsplash)

Feet Care Tips for Summer: उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी घेण्यासोबतच पायांचीही काळजी घेणे खूप गरजेचे असते. कारण या काळात कडक उन्हामुळे आणि धुळीमुळे पाय खूप घाण आणि काळे पडतात. जर पाय स्वच्छ नसतील तर ते खूप वाईट दिसतात आणि लूक देखील खराब करू शकतात. पायांचा रंग गोरा आणि स्वच्छ ठेवण्यासाठी या गोष्टींचा अवलंब करा.

ट्रेंडिंग न्यूज

कशी करावी बेसिक केअर?

- आपल्या पायांची योग्य काळजी घेणे सुरू करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे चांगली स्वच्छता राखणे. अशा स्थितीत आंघोळ करताना पाय साबणाने आणि कोमट पाण्याने चांगले स्वच्छ धुवावेत.

- आंघोळीनंतर मऊ टॉवेलने आपले पाय पूर्णपणे कोरडे करा. ओलसर ठिकाणी बुरशी वाढतात.

- नेहमी स्वच्छ मोजे आणि शूज घाला जे तुमच्या पायांना श्वास घेण्यास मदत करतात, विशेषतः जर तुम्ही दिवसभरात खूप उभे असाल.

- सार्वजनिक ठिकाणी अनवाणी चालणे टाळा.

उन्हाळ्यात कशी घ्याल पायांची काळजी

- कोरड्या, मृत त्वचेपासून मुक्त होण्यासाठी एक्सफोलिएटिंग फूट स्क्रब वापरा.

- कोरडी त्वचा असणाऱ्यांनी साखरेवर आधारित

स्क्रब वापरावा. कारण मीठावर आधारित स्क्रबमुळे त्वचा आणखी कोरडी होऊ शकते.

- दररोज पायांवर प्युमिस स्टोन वापरल्याने देखील एक्सफोलिएशन होण्यास मदत होते.

- झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझिंग फूट क्रीम वापरा.

- दिवसा हलके, मजबूत शूज घाला जे तुमच्या पायांना आराम देतात.

पाय कसे स्वच्छ करावे

- एक टब कोमट पाण्याने भरा आणि त्यात शॅम्पूचे काही थेंब आणि अँटीसेप्टिक द्रावण घाला.

- आता तुमचे पाय कमीत कमी १० मिनिटे पाण्यात भिजवा म्हणजे साचलेली घाण मऊ होईल.

- पायाची नखे स्वच्छ करण्यासाठी नेल ब्रशचा वापर करा.

- टाच आणि तळवे यासाठी फूट स्क्रबर वापरा.

- जर पायाचे नखे खूप लांब असतील तर ते कापून टाका.

- पाय हलक्या हाताने कोरडे करा.

- आता मॉइश्चरायझर लावून मसाज करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel