Diabetes in Kids: टाइप १ मधुमेह असलेल्या मुलांची काळजी कशी घ्यावी? काय सांगतात तज्ज्ञ?
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Diabetes in Kids: टाइप १ मधुमेह असलेल्या मुलांची काळजी कशी घ्यावी? काय सांगतात तज्ज्ञ?

Diabetes in Kids: टाइप १ मधुमेह असलेल्या मुलांची काळजी कशी घ्यावी? काय सांगतात तज्ज्ञ?

Published Jul 26, 2024 09:48 PM IST

Diabetes Care Tips: फक्त मोठे लोक नाहीत तर लहान मुलांना सुद्धा मधुमेह असतो. टाइप १ मधुमेह असलेल्या मुलांची काळजी कशी घ्यावी ते येथे जाणून घ्या.

मुलांमधील टाइप १ मधुमेह
मुलांमधील टाइप १ मधुमेह (pixabay)

Type 1 Diabetes in Kids: मुलांच्या काळजीने पालक नेहमी चिंतेते असतात. तुमच्या मुलाला टाइप १ मधुमेह असल्याचे निदान झाले असल्यास पालकांनी मुलांची विशेष काळजी घेतली पाहिजे. टाइप १ मधुमेहामध्ये रक्तातील साखरेच्या पातळी वर सातत्याने लक्ष ठेवणे गरजचे आहे. टाइप १ मधुमेह असूनही तुमच मुलं परिपूर्ण निरोगी आयुष्य जगू शकतं. दैनंदिन व्यायाम करणे हा त्यावर रामबाण उपाय आहे. टाइप १ मधुमेह असलेल्या मुलांची काळजी कशी घ्यावी याबाबत तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घ्या

काय सांगतात तज्ज्ञ

मुंबईच्या झेन मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटलमधील पीडिअॅट्रिक एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. प्रशांत पाटील म्हणाले, “टाइप १ डायबिटिस असलेल्या मुलाच्या रुटीनमध्ये शारीरिक व्यायामाचा समावेश करणे हे त्यांच्या आरोग्यासाठी आणि स्वास्थ्यासाठी महत्त्वाचे आहे. रोज ३० मिनिटे व्यायाम केल्यास रक्तातील साखरेच्या नियंत्रणा वर सकारात्मक प्रभाव दिसेल. त्यांना निरोगी जीवनशैली लाभेल.

अबॉटच्या मेडिकल अफेअर्स, इमर्जिंग एशिया अँड इंडिया, डायबेटिस केअर विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत सुब्रमण्यन सांगतात, “मुलांसाठी मधुमेहाचे व्यवस्थापन करणे कठीण असते, परंतु पालक मदत करू शकतात. CGM उपकरण नावाची नवीन उपकरणे वेदना न होता ग्लुकोजची पातळी चेक करणे सोपे करू शकतात. ही उपकरणे स्मार्टफोनशी कनेक्ट होऊ शकतात. ज्यामुळे पालक त्यांच्या मुलाच्या ग्लुकोजच्या पातळीचे रिअल-टाइममध्ये निरीक्षण करू शकतात आणि इन्सुलिन कधी द्यायचे हे जाणून घेऊ शकतात. हे पालकांना त्यांच्या मुलाच्या मधुमेहाचे व्यवस्थापन करण्याबद्दल अधिक आत्मविश्वास आणि चिंता कमी करण्यास मदत करते.

नियमित तपासा रक्तातील साखरेची पातळी

मुले खेळायला किंवा धावायला जाण्यापूर्वी ग्लुकोजची पातळी तपासा. असे केल्याने इन्सुलिनचा पुढचा डोस निश्चित करण्यास मदत होते. FreeStyle Libre सारख्या कन्टिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग उपकरणाच्या मदतीने तुम्ही हे सहज करू शकता. अशी उपकरणे मोबाइल फोनमधल्या ॲपशी ही जोडली जातात, ज्यामुळे तुम्हाला त्यावरील आकडेवारी सहज प्राप्त होऊ शकते. संपूर्ण दिवसभर आणि रात्रीही ग्लुकोजची पातळी मोजता येते.

मुलांच्या आवडीची कामे करू द्या

मुलांना सक्रिय ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांच्या आवडीची कामे त्यांना करायला द्या . उदा आवडता व्यायाम, सायकल चालवणे, नृत्य, क्रिकेट खेळणे. फक्त मुलं एकटी पडणार नाही याची काळजी घ्यावी. मुलांसोबत पालकांनी सुद्धा व्यायाम करावे. टाइप २ डायबेटिस असलेल्या मुलांना पुरेशी झोप घेणे तितकेच महत्वाचे आहे.

स्नॅक्स सोबत ठेवावा

व्यायाम करण्यापूर्वी रक्तातील साखरेची पातळी १०० mg/dl च्या खाली असेल तर व्यायाम सुरू करण्यापूर्वी १५ ग्रॅम्स कर्बोदके खाणे महत्वाचे आहे. तुमचं मुलं ३० मिनिटांपेक्षा जास्त बाहेर फिरणार नाही याची काळजी घ्यावी. बऱ्याचदा वर्कआऊट पूर्वीच्या खाण्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहत नाही. अशावेळी व्यायाम करत असताना थोडा स्नॅक्स सोबत ठेवावा.

अन्नानुसार साखरेची पातळी तपासा

तुमच्या मुलांच्या रक्तातील साखरेची पातळी वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नाला आणि व्यायामाला कशा प्रकारे प्रतिसाद देते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. व्यायामाच्या दरम्यान त्यांच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी, ते काय खात आहेत आणि कोणता व्यायाम करत आहेत हे वेळेसह नोंदवून ठेवा. यानुसार त्यांच्या संपूर्ण व्यायामाचे आणि खाण्यापिण्यचे वेळापत्रक तयार करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner