मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Pregnancy Tips: प्रेग्नेंसीच्या शेवटच्या ३ महिन्यात अशा प्रकारे तयार करा शरीर, सहज होईल नॉर्मल डिलिव्हरी

Pregnancy Tips: प्रेग्नेंसीच्या शेवटच्या ३ महिन्यात अशा प्रकारे तयार करा शरीर, सहज होईल नॉर्मल डिलिव्हरी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 26, 2024 11:15 PM IST

Easy Normal Delivery: नॉर्मल डिलिव्हरी ही गर्भधारणेची एक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये स्त्रीच्या योनीमार्गे बाळाचा जन्म होतो. त्यामुळे शेवटच्या ३ महिन्यांत महिलांनी या प्रकारे आपले शरीर तयार करावे.

नॉर्मल डिलिव्हरीसाठी शरीर तयार करण्यासाठी टिप्स
नॉर्मल डिलिव्हरीसाठी शरीर तयार करण्यासाठी टिप्स

Tips to Prepare Body for Labor: नॉर्मल डिलिव्हरी ही बाळाला जन्म देण्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र, आजकाल महिलांना ऑपरेशनद्वारे मुलाला जन्म देणे सोपे वाटते. यामुळे नॉर्मल डिलिव्हरी दरम्यान होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो. पण भविष्यात तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गरोदरपणात काही गुंतागुंत नसेल तर नैसर्गिकरीत्या मुलाला जन्म देण्याचा सल्ला दिला जातो. गरोदरपणाच्या नवव्या महिन्यात नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता वाढवण्यासाठी या गोष्टींचा अवलंब करा. या टिप्स खूप उपयुक्त आहेत.

- गरोदरपणाच्या ३४ आठवड्यांपासून दररोज ४-६ खजूर खाणे सुरू करावे, असे म्हटले जाते. हे केवळ पोषक आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध नाहीत तर हे तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीमध्ये मदत करू शकतात.

- शेवटच्या महिन्यांत हर्बल टी प्या, ते गर्भाशयाला मजबूत करण्यास मदत करते. हे प्यायल्याने प्रसूती सुलभ आणि लवकर होईल.

- गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांमध्ये तुमच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या. पोषक तत्वांनी युक्त अन्न तुम्हाला आणि बाळाला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवते. ज्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता वाढते.

- याशिवाय तज्ञांच्या सल्ल्यानुसार कमीत कमी ३ स्ट्रेंथ ट्रेनिंग वर्कआउट करा. शरीर मजबूत ठेवण्यास मदत होते. गरोदरपणात व्यायाम केल्याने आई आणि बाळ दोघांनाही अनेक फायदे होतात.

- चालल्यानंतर योगासने करावीत कारण ते तणाव दूर करण्यासाठी, मन शांत करण्यासाठी आणि इतर समस्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे.

- व्यायामाव्यतिरिक्त फिरायला जा. गर्भधारणेदरम्यान हे करणे चांगले मानले जाते. बाळाला सहज जन्म देण्यासाठी हे फायदेशीर आहे.

- बाळंतपणापूर्वी हिप ओपनिंग स्ट्रेच आणि पेल्विक फ्लोअर रिलॅक्सेशन व्यायाम करणे सुरू करा. गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यांत पेल्विक फ्लोरला विश्रांती देणे महत्वाचे आहे. शिवाय बाळाच्या जन्मासाठी ते उघडणे देखील आवश्यक आहे. कोणताही व्यायाम करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग