Vegetable Pasta Recipe: पिझ्झा, बर्गर, पास्ता असे प्रकार मुलांना खायला खूप आवडतात. पण नेहमी बाजारात मिळणाऱ्या या गोष्टी मुलांना देणे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. शिवाय मुले घरी भाज्या खात नाही. त्यामुळे महिलांना त्यांना भाज्या देण्यासाठी नवीन नवीन ट्रिक्स शोधाव्या लागतात. जर तुमची मुले सुद्धा भाज्या खाण्यासाठी कंटाळा करत असतील आणि जंक फूड खायची मागणी करत असतील ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. मुलांसाठी घरी सोप्या पद्धतीने व्हेजिटेबल पास्ता बनवून तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. व्हेजिटेबल पास्ताची रेसिपी टेस्टी आणि हेल्दी आहे. चला तर मग जाणून घ्या व्हेजिटेबल पास्ता कसा बनवायचा
- २ कप व्हीट पास्ता
- अर्धा कप क्रीम
- अर्धा कप टोमॅटो प्युरी
- १ बारीक चिरलेला टोमॅटो
- १ बारीक चिरलेला कांदा
- १ बारीक चिरलेली सिमला मिरची
- १ टीस्पून आले लसूण पेस्ट
- अर्धा टीस्पून ओरेगॅनो
- अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स
- २ चमचे बटर
- चवीनुसार मीठ
टेस्टी आणि हेल्दी व्हेजिटेबल पास्ता बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात पाणी टाकून त्यात पास्ता, थोडे मीठ आणि ४-५ थेंब तेल टाकून पास्ता उकळायला ठेवा. यानंतर दुसऱ्या पॅनमध्ये बटर टाका आणि त्यात आले लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची टाका. तुम्ही यात गाजर, स्वीट कॉर्न आणि ब्रोकोली सुद्धा टाकू शकता. आता या सर्व भाज्या घालून हलक्या भाजून घ्या. यानंतर पॅनमध्ये टोमॅटोची प्युरी घाला आणि भाज्यांसह चांगले मिक्स करा. आता पॅनमध्ये मीठ, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो घालून मिक्स करा. यानंतर त्यात क्रीम घाला आणि चांगले मिक्स करा.
आता यात उकळलेला पास्ता टाकून चांगले टॉस करा. तुमचा टेस्टी आणि हेल्दी व्हेजिटेबल पास्ता तयार आहे. गरमा गरम सर्व्ह करा.
संबंधित बातम्या