मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Tiranga Pulao सोबत आणखी खास बनवा प्रजासत्ताक दिवस, झटपट तयार होते ही रेसिपी

Tiranga Pulao सोबत आणखी खास बनवा प्रजासत्ताक दिवस, झटपट तयार होते ही रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 25, 2024 08:48 PM IST

Republic Day 2024: प्रजासत्ताक दिन आणखी खास बनवण्यासाठी तुम्ही टेस्टी तिरंगा पुलाव बनवू शकता. जाणून घ्या याची सोपी रेसिपी.

तिरंगा पुलाव
तिरंगा पुलाव (freepik)

Tiranga Pulao Recipe: यंदा देशभरात ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. हा खास दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तुम्हीही घरच्या घरी हा खास तिरंगा पुलाव बनवून तुमच्या कुटुंबासोबत देशभक्तीच्या रंगात रंगून या उत्सवात सहभागी होऊ शकता. ही रेसिपी बनवायला जेवढी सोपी आहे तेवढीच खायला टेस्टी आहे. चला तर मग जाणून घ्या झटपट बनवणारी तिरंगा पुलावची रेसिपी.

तिरंगा पुलाव बनवण्यासाठी साहित्य

केशरी भातासाठी

- १ कप बासमती तांदूळ हलके शिजवलेले

- २ चमचे तूप

- १/४ टीस्पून जिरे

- १ टीस्पून आल्याची पेस्ट

- १/४ कप टोमॅटो प्युरी

- १/२ टीस्पून हळद

- १/२ टीस्पून लाल तिखट

- लाल मिरचीची पेस्ट

- चवीनुसार मीठ

पांढऱ्या भातासाठी

- १ कप बासमती तांदूळ (शिजवलेला)

हिरव्या भातासाठी

- २ चमचे तूप

- १/४ टीस्पून जिरे

- १ टीस्पून आल्याची पेस्ट

- १ टीस्पून हिरवी मिरचीची पेस्ट

- १/२ कप पालक प्युरी

- मीठ चवीनुसार

तिरंगा पुलाव बनवण्याची पद्धत

तिरंगा पुलाव बनवण्यासाठी प्रथम दोन वेगवेगळ्या नॉनस्टिक पॅनमध्ये २ टेबलस्पून तूप गरम करून त्यात जिरे घाला. यानंतर कढईत तांदूळ घाला आणि थोडावेळ मिक्स करा. आता त्यात आल्याची पेस्ट, लाल तिखट आणि लाल मिरचीची पेस्ट घाला. कढईत मिठ आणि टोमॅटो प्युरी घाला आणि चांगले मिक्स करा. एक कप पाणी घालून मिक्स करा. आता त्यावर झाकून ठेवा आणि भात शिजवा. आता दुसऱ्या पॅनमध्ये जिरे टाका आणि रंग बदलेपर्यंत भाजा. यानंतर कढईत तांदूळ टाकून त्यात हळद, हिरवी मिरची पेस्ट, आले पेस्ट आणि मीठ टाका. आता त्यात अर्धी वाटी पाणी घालून चांगले मिक्स करून झाकण ठेवून शिजवा. पाणी उकळायला लागल्यावर त्यात पालक प्युरी टाकून नीट मिक्स करा. झाकून ठेवा आणि भात शिजेपर्यंत शिजवा.

आता प्लेटमध्ये रिंग मोल्ड ठेवा. त्यात हिरवा भात घाला आणि हलके दाबा. आता त्यावर शिजलेला पांढरा भात घालून हलके दाबून घ्या. यानंतर केशरी भात घाला आणि साचा पूर्णपणे भरा आणि हलके दाबून ते एकसारखे करा. रिंग मोल्ड हळूहळू काढून घ्या. तुमचा तिरंगा पुलाव सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

WhatsApp channel