Paneer Tikka Sandwich: संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा पनीर टिक्का सँडविच, आहे टेस्टी आणि हेल्दी रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Paneer Tikka Sandwich: संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा पनीर टिक्का सँडविच, आहे टेस्टी आणि हेल्दी रेसिपी

Paneer Tikka Sandwich: संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा पनीर टिक्का सँडविच, आहे टेस्टी आणि हेल्दी रेसिपी

Published Jul 13, 2024 04:57 PM IST

Evening Snacks Recipe: संध्याकाळी चहासोबत सँडविच बनवण्याचा विचार करत असाल तर पनीर टिक्का सँडविचची ही रेसिपी ट्राय करा.

पनीर टिक्का सँडविच
पनीर टिक्का सँडविच (freepik)

Paneer Tikka Sandwich Recipe: संध्याकाळी चहा, कॉफी सोबत काहीतरी टेस्टी स्नॅक्स खायला सर्वांनाच आवडते. सँडविच हा असा प्रकार आहे जो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. सँडविच विविध प्रकारे बनवता येते. विविध भाज्या, चीज, पनीर, वापरून सँडविच बनवले जाते. तुम्ही सुद्धा संध्याकाळच्या नाश्त्यात सँडविच बनवण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तुम्ही पनीर टिक्का सँडविच झटपट बनवू शकता. ही रेसिपी फक्त टेस्टीच नाही तर हेल्दी सुद्धा आहे. चला तर मग जाणून घ्या कसे बनवायचे पनीर टिक्का सँडविच.

 

पनीर टिक्का सँडविच बनवण्यासाठी तुम्हाला पाहिजे -

- ब्रेड स्लाइस

- पनीर

- भाजलेले बेसन

- हंग कर्ड

- कांदा

- शिमला मिरची

- लिंबाचा रस

- कसुरी मेथी

- आले लसूण पावडर

- मेयोनिज

- टोमॅटो केचप

- चिली फ्लेक्स

- ऑरेगॅनो

- लाल तिखट

- धने पावडर

- गरम मसाला

- आमचूर पावडर

- जिरे पावडर

- तूप

- मोहरी तेल

- काळे मीठ

- मीठ

असे बनवा पनीर टिक्का सँडविच

टेस्टी आणि हेल्दी पनीर टिक्का सँडविच बनवण्यासाठी प्रथम पनीर, कांदा आणि शिमला मिरचीचे लहान चौकोनी तुकडे करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कांदा आणि शिमला मिरचीचे लांब काप करू शकता. आता एका भांड्यात मोहरीचे तेल घ्या. नंतर त्यात लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर, जिरेपूड, मीठ, काळे मीठ, कसुरी मेथी, दही, आले लसूण पावडर, भाजलेले बेसन आणि लिंबाचा रस घाला. आता हे सर्व नीट मिक्स करून घ्या. नंतर या मिश्रणात पनीर, शिमला मिरची आणि कांदा घाला. आता हे काही वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवा.

थोड्या वेळाने पनीर टिक्का ओव्हनमध्ये शिजवा. तुम्ही हे पॅनमध्ये सुद्धा शिजवू शकता. आता ब्रेडवर लावण्यासाठी स्प्रेड तयार करा. यासाठी एका वाटीत मेयोनिज घ्या. त्यात टोमॅटो केचप घाला. नंतर त्यात चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो मिक्स करा. आता हा तयार केलेला स्प्रेड ब्रेडवर लावा. त्यावर तयार केलेले पनीरचे स्टफिंग भरा. त्यावर दुसरी ब्रेड स्लाइस ठेवून ते नीट बंद करा. 

आता हे सँडविच टोस्टरमध्ये किंवा तव्यावर झाकण ठेवून भाजून घ्या. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात चीज देखील वापरू शकता. तुमचे पनीर टिक्का सँडविच सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

Whats_app_banner