Healthy Drink to Control Bad Cholesterol: आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात, एक गुड कोलेस्ट्रॉल आणि एक बॅड कोलेस्ट्रॉल. जेव्हा आपल्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते तेव्हा अनेक समस्या उद्भवतात. यामुळे हृदयविकार, हार्ट अटॅक, लिव्हर खराब होणे आणि फुफ्फुसाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत असे एक हेल्दी ड्रिंक जाणून घ्या ते तुमची कोलेस्ट्रॉल पातळी राखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हे हेल्दी ड्रिंक कसे बनवायचे ते येथे जाणून घ्या.
- आले
- फ्लेक्स सीड्स
- चक्रफूल
- मेथी दाणे
- दालचिनी
हे खास हेल्दी ड्रिंक बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये १ ग्लास पाणी गरम करा. नंतर हे पाणी उकळायला लागले की त्यात चक्रफूल, दालचिनी, आले, मेथी दाणे आणि फ्लेक्स सीड्स टाका. यानंतर पाणी मध्यम आचेवर सुमारे ५ मिनिटे उकळवा. जेव्हा पाणी चांगले उकळते आणि अर्धे कमी होते तेव्हा ते एका ग्लासमध्ये गाळून घ्या. आता या ड्रिंकमध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्या. तुमचे हेल्दी ड्रिंक तयार आहे. खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी हे ड्रिंक दिवसातून एकदा प्या. याच्या मदतीने तुम्हाला काही दिवसातच फायदा होईल.
कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही हे हेल्दी ड्रिंक दररोज कधीही पिऊ शकता. हे लक्षात ठेवा की ते कधीही रिकाम्या पोटी पिऊ नका. यामुळे तुम्हाला समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच जर तुम्हाला आधीच कोणत्याही प्रकारची समस्या असेल किंवा तुम्ही कोणतेही औषध घेत असाल तर हे ड्रिंक पिण्यापूर्वी एकदा तुमच्या आरोग्य तज्ञाचा सल्ला घ्या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या