Tips to Make Gulkand Recipe: गुलकंद आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांपासून बनलेला गुलकंद घरच्या घरी बनवता येतो. गुलकंदमुळे शरीर थंड राहते आणि बुद्धी तीक्ष्ण होते. याचे नियमित सेवन केल्याने पोटातील उष्णता आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. रोझ डेला तुमच्या घरात भरपूर गुलाबाचे फुल जमा झाल्या असतील तर तुम्ही त्याच्या मदतीने गुलकंद बनवू शकता. घरी बनवलेले गुलकंद हे केमिकल फ्री असते. त्यामुळे ते प्रचंड आरोग्य फायदे देते. चला तर मग जाणून घ्या घरच्या घरी सोप्या पद्धतीने गुलकंद कसे बनवावे.
देशी गुलाब, खडी साखर, वेलची पूड आणि एक काचेचे जार किंवा बरणी
काही गुलाबाच्या पाकळ्या घ्या आणि त्या चांगल्या प्रकारे धुवा. नंतर वेलची खलबत्यात बारीक करून घ्या. आता एक काचेची बरणी घ्या आणि त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाका. त्यानंतर त्यावर एक लेअर खडी साखर घाला. नंतर वेलची पावडरचा दुसरा थर घाला. नंतर पुन्हा गुलाबाच्या पाकळ्यांचा थर घाला. जोपर्यंत तुमच्या सर्व पाकळ्या संपत नाही तोपर्यंत या लेयरिंग प्रक्रियेची पुनरावृत्ती करा. आता बरणीला झाकण लावा आणि बरणी उन्हात ठेवा. ते जाम सारखे दिसू लागेपर्यंत दररोज ते मिक्स करा. गुलकंद चांगलं चविष्ट बनवण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या आणि खडी साखर समान प्रमाणात घ्या. काही दिवसात तुमचे गुलकंद खाण्यासाठी तयार होईल.
संबंधित बातम्या