मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chicken Popcorn: संध्याकाळच्या नाश्त्यात टेस्टी खायची क्रेविंग कमी करेल चिकन पॉपकॉर्न, नॉनव्हेज लव्हर्ससाठी परफेक्ट आहे

Chicken Popcorn: संध्याकाळच्या नाश्त्यात टेस्टी खायची क्रेविंग कमी करेल चिकन पॉपकॉर्न, नॉनव्हेज लव्हर्ससाठी परफेक्ट आहे

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 31, 2024 04:54 PM IST

Nonveg Snacks Recipe: संध्याकाळच्या वेळी काहीतरी चटपटीत खायची क्रेविंग होत असेल, तर तुमची ही इच्छा पूर्ण करेल चिकन पॉपकॉर्नची रेसिपी. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि नॉनव्हेज प्रेमींना नक्की आवडेल.

चिकन पॉपकॉर्न
चिकन पॉपकॉर्न (unsplash)

Chicken Popcorn Recipe for Tea Time: नॉनव्हेज खायला आवडणाऱ्या लोकांना नॉनव्हेज खाण्यासाठी असा ठराविक वेळ नसतो. अगदी सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत ते विविध नॉनव्हेज पदार्थ खाऊ शकतात. तुम्ही सुद्धा नॉनव्हेज लव्हर असाल आणि संध्याकाळच्या नाश्त्यात काहीतरी चटपटीत खायची इच्छा असेल, तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. तुम्ही चिकन पॉपकॉर्नची ही रेसिपी सहज बनवू शकता. शिवाय हे झटपट तयार होते. नॉनव्हेज प्रेमींना ही रेसिपी नक्की आवडेल. चला तर मग जाणून घेऊया कसे बनवायचे चिकन पॉपकॉर्न.

चिकन पॉपकॉर्न बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- २ छोटे चमचे कॉर्नफ्लोअर

- १/२ कप ब्रेड क्रम्ब्स

- ५०० ग्रॅम चिकन

- १ कप तेल

- १/२ टीस्पून आले पेस्ट

- १/२ टीस्पून लसूण पेस्ट

- १/२ टीस्पून लिंबाचा रस

- १/२ टीस्पून लाल तिखट

- १/२ टीस्पून गरम मसाला

- १ टीस्पून हळद

- चवीनुसार मीठ

चिकन पॉपकॉर्न बनवण्याची पद्धत

हे बनवण्यासाठी प्रथम सर्व मसाले एका भांड्यात घ्या. हे सर्व चांगले मिक्स करा. आता या मिश्रणात ब्रेड क्रम्ब्स, कॉर्नफ्लोअर घाला. यानंतर चिकन नीट स्वच्छ करा आणि त्याचे छोटे तुकडे करा. आता हे चिकनचे तुकडे मिश्रणात मिक्स करा. नंतर एका कढईत तेल गरम करा. या मिश्रणात चिकनचे तुकडे बुडवून ते तेलात टाका. चांगले सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. तुमचे टेस्टी चिकन पॉपकॉर्न तयार आहे. गरमागरम चिकन पॉपकॉर्न टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

WhatsApp channel