Tips To Keep Kids Hydrated: लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे हवामानात बदल होताच मुले लवकर आजारी पडू लागतात. सध्या ऑक्टोबर हीट वाढत आहे. कडक ऊन आणि उष्णता मुलांना डिहायड्रेट करू शकते आणि त्यांचे आरोग्य बिघडू शकते. मुलाच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा केला गेला तर समस्या अधिक गंभीर होऊ शकते. अशा स्थितीत मुलांमध्ये डिहायड्रेशनची लक्षणे कोणती आहेत आणि ही समस्या टाळण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत हे जाणून घ्या.
लहान मुलांमध्ये थकवा, वारंवार तोंड कोरडे होणे, गडद रंगाचा लघवी आणि चक्कर येणे ही लक्षणे दिसू लागली तर समजून घ्या की मुलाचे शरीर डिहायड्रेट होत आहे. ही समस्या टाळण्यासाठी मुलांना हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करा. यासाठी मुलांना शक्य तितके लिक्विड पिण्यासाठी द्या. याशिवाय त्यांना बाहेर उन्हात जास्त वेळ नेऊ नका.
मुलांच्या शरीरात पाण्याची कमतरता भासू नये त्यामुळे त्यांच्या आहारात जास्तीत जास्त द्रव पदार्थांचा समावेश करा. मुलांना टरबूज, काकडी, सफरचंद, स्ट्रॉबेरी, अननस यासारखी फळे खायला द्या. या गोष्टींमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीर दीर्घकाळ हायड्रेट राहते.
ऑक्टोबर हीटमुळे शरीरात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी मुलांना रोज नारळ पाणी प्यायला हवे. शरीरातील पाण्याची कमतरता नारळ पाणी पिऊन सहज भरून काढता येते.
मुलांना डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी त्यांना विविध फळाचे ज्यूस देऊ शकता. मुले फळे खाण्याचा कंटाळा करत असतील तर त्यांना फळांचे फ्रेश ज्यूस द्या. यामुळे त्यांचे शरीर हायड्रेट आणि निरोगी राहते.
लिंबू पाणी केवळ उष्माघातच नाही तर डिहायड्रेशनची समस्या देखील दूर ठेवण्यास मदत करते. मात्र, लहान मुलांना लिंबू पाणी देताना त्यात साखरेचा जास्त वापर करू नका. असे केल्याने मुलाच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या