पावसाळ्यात डोळ्यांना संसर्ग होण्यापासून सुरक्षित ठेवायचं आहे? अशी घ्या काळजी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  पावसाळ्यात डोळ्यांना संसर्ग होण्यापासून सुरक्षित ठेवायचं आहे? अशी घ्या काळजी

पावसाळ्यात डोळ्यांना संसर्ग होण्यापासून सुरक्षित ठेवायचं आहे? अशी घ्या काळजी

HT Marathi Desk HT Marathi
Published Jun 23, 2025 12:19 PM IST

Monsoon Care Tips: पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासोबतच डोळ्यांची सुद्धा विशेष काळजी घ्यावी लागले. या काळात डोळ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी काय करावे हे जाणून घ्या.

eye care tips for monsoon
eye care tips for monsoon

Tips To Keep Eyes Safe From Infection: पावसाळा हा सगळीकडे हिरवळीचा, आल्हाददायक आणि नव्या बहराचा असला, तरी हा काळ संसर्गजन्य रोगांचाही असतो. पावसाळा जोर धरत असून अशावेळी डोळ्यांमध्ये लालसरपणा, खाज, एलर्जीमुळे डोळ्यांमधून स्त्राव होणे, डोळे येणे वगैरे समस्या सुरू होतात. पावसाळ्यात आरोग्यासोबतच डोळ्यांची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. पिंपरी चिंचवड येथील डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटलच्या सल्लागार, नेत्ररोगतज्ञ डॉ. सोनल इरोले यांनी पावसाळ्यात डोळ्यांना संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टी स्पष्ट केले.

अशी घ्या काळजी

१. डोळ्यांना हात लावण्यापूर्वी हात साबण व पाण्याने स्वच्छ धुणे.

२. अस्वच्छ हातांनी डोळ्यांना स्पर्श न करणे.

३. एकमेकांचे टॉवेल्स किंवा मेकअपच्या वस्तू न वापरणे.

४. डोळे चोळू नका.

५. जर तुम्ही पावसात भिजत असाल, तर पावसाच्या पाण्यापासून डोळे सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास त्यानंतर डोळे स्वच्छ पाण्याने धुवा.

६. डोळे लालसर झाल्यास, दुखत असल्यास, डोळ्यांमधून स्त्राव होत असल्यास डॉक्टरांकडे जा आणि तज्ज्ञांकडून उपचार घ्या.

७. तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल, तर पावसाळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते. कॉन्टॅक्ट लेन्सेस घातलेले असताना पावसाच्या पाण्याने डोळे भिजले, तर लवकरात लवकर लेन्स काढा आणि सोल्युशने स्वच्छ करा. डोळेही स्वच्छ पाण्याने धुवा. डोळे चोळू नका.

८. शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा आणि समतोल आहार घ्या.

९. काळजी घेऊनही डोळ्यांमध्ये संसर्ग होत असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ड्रॉप्स घाला. कुटुंबातील इतर सदस्यांपासून दूर राहा, म्हणजे त्यांना डोळ्यांचा संसर्ग होणार नाही.

१०. सामान्यपणे डोळ्यांचे असे आजार संसर्गजन्य असतात. बऱ्याच रुग्णांना डोळ्यांच्या संसर्गासोबत तापही येतो. तुम्हालाही अशी लक्षणे दिसत असल्यास तापावर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

११. डोळे येण्याचा संसर्ग झाला असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. समारंभात किंवा जिथे इतरांना संसर्ग होऊ शकतो, अशा ठिकाणी जाणे टाळा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner