Rosemary Oil and Water for Hair Care: सतत केस तुटणे आणि गळणे यामुळे तुम्ही त्रस्त असाल तर आता टेन्शन घेऊ नका. कारण तणावामुळे केस आणखीनच मुळापासून कमकुवत होतात. तसेच रासायनिक उत्पादने आणि हेअर स्टाइलिंग टूल्स केस पूर्णपणे कोरडे आणि निर्जीव बनवतात. त्यामुळे केस कमकुवत होऊन तुटायला लागतात. केस तुटणे आणि गळणे यामुळे तुम्ही हैराण असाल तर बाजारातून विविध प्रोडक्ट घेण्याऐवजी रोझमेरी ट्री खरेदी करा. रोझमेरी केसांचे आरोग्य सुधारण्यास खूप मदत करते. केसांचे गळणे कमी करण्यासाठी आणि हेअर ग्रोथसाठी रोझमेरी कशी वापरायची ते जाणून घ्या.
केसांच्या वाढीसाठी रोझमेरी ऑइल हा एक चांगला पर्याय आहे. अभ्यासानुसार रोझमेरीमध्ये कार्नोसिक अॅसिड एक सक्रिय घटक आहे, जो ऊती आणि खराब झालेल्या नसा दुरुस्त करतो. रोझमेरी केसांच्या टाळूवर झालेले नुकसान दूर करून नवीन केस वाढण्यास मदत करते. त्यामुळे केसांना रोझमेरी ऑइल लावल्याने केस गळणे थांबते आणि नवीन केस येतात.
रोझमेरी वॉटरच्या मदतीने हेअर ग्रोथ वाढवता येते. यासाठी फक्त रोझमेरीची पाने घ्या आणि पाण्यात उकळा. ते अर्धे होईपर्यंत उकळवा. आता हे पाणी साधारण अर्धा तास थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. नंतर गाळून बॉटलमध्ये भरून घ्या. रोझमेरी वॉटर तयार आहे.
हे एका स्प्रे बॉटलमध्ये भरून हे पाणी टाळूवर स्प्रे करा आणि हलक्या हाताने मसाज करा. हे पाणी दिवसातून दोनदा टाळूला लावा. यामुळे केसांची वाढ होते आणि केसगळतीपासून सुटका मिळते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या