Skin Care Routine of Kriti Sanon: क्रिती सेनन आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिती सेनन ही बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जी नेहमीच सुंदर दिसते. मग ती मोठ्या पडद्यावर असो किंवा पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झालेली. तिच्या स्लिम फिट फिगरसह तिची त्वचा देखील नेहमीच चमकते. तिची फ्लॉलेस स्किन पाहून मुलींच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की ती तिच्या त्वचेसाठी काय करते. क्रिती सेननने स्वतः तिच्या ग्लोइंग स्किनचे रहस्य शेअर केले आहे. ज्यामध्ये ती मेकअपनंतर चेहरा साफ करण्यासोबतच नाइट स्किन केअर रूटीन फॉलो करताना दिसत आहे.
क्रिती सेननने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना तिच्या स्किन केअर रूटीनबद्दल सांगितले होते. तिची फ्लॉलेस स्किन टिकवून ठेवण्यासाठी क्रिती तिच्या चेहऱ्यावर जास्त काळ मेकअप राहू देत नाही. शूटिंगनंतर ती सर्वात आधी चेहऱ्यावरील मेकअप आणि घाण साफ करते. यासाठी डबल क्लींज करण्याची तिला सवय आहे. अशा प्रकारे त्वचा करते क्लीन
- क्लिंझिंग ऑइल
- फेसवॉश
क्रिती प्रथम तिचा चेहरा स्वच्छ करण्यासाठी क्लिंजिंग ऑइल वापरते. जेणेकरून डोळ्यांपासून चेहऱ्यापर्यंतचा सर्व मेकअप स्वच्छ होईल. यानंतर ती फेसवॉशने चेहरा पूर्णपणे स्वच्छ करते.
क्रिती सकाळसाठी तिची त्वचा तयार करण्यासाठी नाइट स्किन केअर रूटीन फॉलो करते. ज्यामध्ये मॉइश्चरायझर ते रेटिनॉल सीरम, नियासिनमाइड टोनर, हायड्रेटिंग सीरम आणि लिप बाम यांचा समावेश आहे.
फक्त त्वचाच नाही तर क्रितीच्या नाइट स्किन केअरमध्ये भुवया आणि पापण्यांची काळजी घेणे देखील समाविष्ट आहे. ती रोज रात्री झोपण्यापूर्वी तिच्या भुवया आणि पापण्यांवर एरंडेल आणि ऑलिव्ह ऑइलचे मिश्रण लावते.
चेहर्यावर इतके ब्युटी प्रोडक्ट वापरण्यापूर्वी क्रिती सर्वप्रथम चेहऱ्यावर गुलाब जल स्प्रे करायला विसरत नाही. जेणेकरून सीरम त्वचेत सहज शोषले जाईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या