मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Pedicure Health Benefits: या लोकांनी अवश्य करावे पेडिक्योर, पायांच्या सौंदर्यासह आरोग्यासाठीही आहे फायदेशीर

Pedicure Health Benefits: या लोकांनी अवश्य करावे पेडिक्योर, पायांच्या सौंदर्यासह आरोग्यासाठीही आहे फायदेशीर

Jun 17, 2024 01:09 PM IST

Beauty and Health Tips: पेडिक्योर सहसा फक्त ब्युटीशी संबंधित म्हणून म्हटले जाते. परंतु हे केवळ सौंदर्यच नाही तर आरोग्यासाठी देखील महत्वाचे आहे. जाणून घ्या आरोग्यासाठी पेडिक्योरचे फायदे.

पेडिक्योरचे आरोग्य फायदे
पेडिक्योरचे आरोग्य फायदे

Health Benefits of Pedicure: पेडिक्योर हा ब्युटी ट्रीटमेंट मानला जातो. पण पेडीक्योर हा ब्युटी ट्रीटमेंट नसून पायाच्या आरोग्यासाठी देखील महत्त्वाचा आहे. घाणेरडे पाय चमकल्याने सौंदर्य तर वाढतेच शिवाय अनेक आजारांपासून ही बचाव होतो. पेडिक्योरवर पैसे आणि वेळ वाया घालवणं टाळत असाल तर जाणून घ्या या फायद्यांबद्दल. हे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही कधीच पेडिक्योर चुकवणार नाही. घरी किंवा पार्लरमध्ये नक्कीच पेडिक्योर करा.

ब्लड सर्कुलेशन वाढवण्यात मदत

पेडीक्योरमुळे पाय सुंदर तर दिसतातच पण स्क्रब आणि मसाजमुळे पायांचे रक्ताभिसरण ही वाढते. ज्यामुळे पायांच्या स्नायूंमध्ये होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो. तसेच पायात होणारे ब्लड क्लॉटिंग, व्हेरिकोज व्हेन्स यासारख्या समस्याही लवकर उद्भवत नाहीत.

ट्रेंडिंग न्यूज

स्ट्रेस दूर करते

दिवसभराच्या थकव्यानंतर पाय कोमट पाण्यात बुडवल्यास ताण कमी होतो. यामुळे थकवा तर दूर होतोच, शिवाय पायांच्या माध्यमातून तुमचे टेन्शन आणि स्ट्रेस सुद्धा दूर होते. आणि तुम्हाला रिलॅक्स वाटतं. त्यामुळे पेडीक्योर तणाव दूर करण्यास मदत करते.

फुट कॅलसपासून आराम

अनेक लोकांना पायात मृत त्वचा जमा झाल्यामुळे फूट कॉर्न किंवा फूट कॅलस होतो. ही समस्या अतिशय वेदनादायी आहे. अशावेळी वेळीच पाय स्वच्छ केल्याने फूट कॉलसची समस्या उद्भवत नाही.

फाटलेल्या टाचांपासून मुक्ती

उन्हाळ्यातही काही लोकांना फाटलेल्या टाचांचा त्रास होतो. याचे कारण कधी कधी ओमेगा ३ फॅटी अॅसिडची कमतरता किंवा हायपोथायरॉईडसारख्या समस्यांमुळे पायांची त्वचा कोरडी राहते आणि मॉइश्चरायझरची कमतरता भासते. अशावेळी नियमित पेडिक्योर केल्याने पाय मॉइश्चराइझ राहतात.

मधुमेहात पायांना मिळते विश्रांती

मधुमेहाच्या रुग्णांचे पाय अनेकदा खराब होतात. पायात रक्ताभिसरण कमी होणे, पायात फ्लूइड तयार होणे हे त्याचे कारण आहे. अशा वेळी पेडीक्योर मुळे मधुमेहाच्या रुग्णामध्ये रक्ताभिसरण तर योग्य राहतेच शिवाय फ्लूइड जमा होऊ देत नाही. पेडीक्योर मधुमेहाचा रुग्णांच्या पायातील बॅक्टेरिया साफ करतो. ज्यामुळे जखम लवकर भरण्यास मदत होते.

फंगल इंफेक्शनपासून बचाव

पेडीक्योर पाय स्वच्छ ठेवते. तसेच नखे सुद्धा नीट स्वच्छ आणि ग्रूम राहतात. अशा वेळी बॅक्टेरिया वाढण्याची आणि संसर्ग होण्याची शक्यता संपुष्टात येते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel