Health Benefits of Eating Neem Leaves: कडुलिंबाची पाने चवीला कडू असली तरी त्यांच्या गुणधर्मामुळे ती आरोग्यासाठी वरदान मानली जातात. आयुर्वेदानुसार दररोज सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने चावून खाल्ल्याने व्यक्तीला अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने चावून खाल्ल्याने आरोग्याशी संबंधित कोणते फायदे मिळतात ते जाणून घ्या.
अभ्यासानुसार कडुलिंबाची पाने वजन कमी करण्यास मदत करतात. फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन (FAO) च्या आधीच्या अभ्यासात असेही सुचवले आहे की कडुलिंबाच्या पानांचा अर्क मानवांमध्ये लठ्ठपणा कमी करू शकतो.
आज ढासळती असलेली जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लोकांना औषधांची मदत घ्यावी लागते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधासोबत ही कडुलिंबाची रेमिडी देखील करून पाहू शकता. ज्यामध्ये कडुलिंबाची पाने सकाळी रिकाम्या पोटी चावून खावी. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कडुनिंबाच्या पानांमध्ये ॲझाडिराक्टिन नावाचे तत्व असते, जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी प्रभावी आहे. रिकाम्या पोटी कडुलिंब चावून खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेवर नियंत्रण राहतेच शिवाय तुमचे रक्तही स्वच्छ राहते.
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने चावून खाल्ल्याने व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढते. कडुनिंबाच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-फंगल इत्यादी गुणधर्म आढळतात. ज्यामुळे शरीराला अनेक संक्रमणांपासून दूर ठेवता येते. हा उपाय करण्यासाठी कडुनिंबाची पाने नियमित चघळणे आणि त्याचे पाणी पिणे किंवा पाने पाण्यात उकळल्यानंतर सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या लोकांसाठीही कडुलिंबाची पाने खूप फायदेशीर आहेत. याचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
कडुनिंबातील घटक प्लेकच्या समस्येपासून तुमचे दात आणि हिरड्यांचे संरक्षण करण्यास मदत करतात. कडुलिंबाच्या पानांमध्ये असलेले बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म कॅविटीपासून देखील आराम देऊ शकतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या