मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cooking Oil: आरोग्याला हानी पोहोचवतात हे तेल, तज्ञांकडून जाणून घ्या स्वयंपाकासाठी कोणते ऑइल आहे बेस्ट

Cooking Oil: आरोग्याला हानी पोहोचवतात हे तेल, तज्ञांकडून जाणून घ्या स्वयंपाकासाठी कोणते ऑइल आहे बेस्ट

Jan 17, 2024 08:21 PM IST

Healthy Eating Tips: किचनमध्ये अनेक प्रकारचे तेल वापरले जातात. पण ते सर्वच स्वयंपाकासाठी योग्य आहेत का? जाणून घ्या स्वयंपाकासाठी कोणते तेल उत्तम आहे.

स्वयंपाकासाठी बेस्ट ऑइल
स्वयंपाकासाठी बेस्ट ऑइल (pexels)

Best Oil for Cooking: निरोगी आरोग्यासाठी योग्य अन्न खाण्याबरोबरच अन्न कसे शिजवले जाते याची देखील काळजी घेतली पाहिजे. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की स्वयंपाक करण्यासाठी कोणत्या प्रकारचे तेल वापरले जाते. जर तुम्ही योग्य तेलात शिजवलेले अन्न खाल्ले नाही तर ते तुमच्या आरोग्याला गंभीर हानी पोहोचवू शकते. तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की बाजारात उपलब्ध असलेले प्रत्येक कुकिंग ऑइल हेल्दी नसते. अलीकडेच आहारतज्ञ लवलीन कौरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे सांगितले आहे की, कोणत्या तेलाचा आहारात समावेश करावा. चला जाणून घ्या स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे.

पोळी, पराठ्यासाठी

रोटी आणि पराठ्यासाठी तूप उत्तम असल्याचे तज्ज्ञ सांगतात. मात्र, पराठा तुपात तळू नये. त्यापेक्षा नीट शिजल्यावर तव्यावरून बाहेर काढून तूप लावून खावे.

ट्रेंडिंग न्यूज

डाळी किंवा वरणाला तडका कसा लावावा?

भारतीय घरांमध्ये डाळ किंवा वरण आणि भाज्यांमध्ये चव वाढवण्यासाठी तूप किंवा रिफाइंड तेलाचा वापर केला जातो. पण हे चुकीचे आहे. तज्ज्ञांच्या मते मोहरी, तीळ किंवा शेंगदाणा तेल हे डाळीमध्ये तडका देण्यासाठी सर्वोत्तम आहे. एक्सपर्ट सांगतात की तडका लावण्यासाठी तुम्ही कोणतेही कोल्ड प्रेस्ड म्हणजेच कच्चे घाणीचे तेल निवडा.

भाज्या भाजण्यासाठी

काहींना कच्च्या भाज्या थोड्याशा भाजून खायला आवडतात. ऑलिव्ह ऑइल भाज्या भाजण्यासाठी किंवा वाफेवर शिजवण्यासाठी चांगले आहे. भारताबाहेर राहणारे लोक एवोकॅडो किंवा द्राक्षाच्या बियांचे तेल वापरू शकतात. हे भारतीय जेवणात तडक्यांसाठी चांगले नाही.

रोजच्या आहारात करा समावेश

तज्ञ सांगतात की रोजच्या जेवणामध्ये मोहरी, तीळ किंवा शेंगदाणा या तिन्ही प्रकारच्या तेलांचा समावेश करायला हवा. यामुळे ओमेगा ३ आणि ओमेगा ६चे संतुलन राखले जाते.

 

कोणत्या तेलापासून राहावे दूर

तज्ञांच्या मते तुम्ही कॅनोला, सूर्यफूल, करडई, वनस्पती आणि पाम तेल वापरणे टाळावे. यासोबतच तज्ज्ञांचे म्हणणे आहे की नमूद केलेले तेल ३ महिने वापरल्यानंतर तुमच्या तब्येतीत बदल दिसून येईल

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel