IRCTC Tour Package: स्वस्तात परदेश प्रवास करायचा आहे? IRCTC घेऊन आले आहे सुवर्णसंधी!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  IRCTC Tour Package: स्वस्तात परदेश प्रवास करायचा आहे? IRCTC घेऊन आले आहे सुवर्णसंधी!

IRCTC Tour Package: स्वस्तात परदेश प्रवास करायचा आहे? IRCTC घेऊन आले आहे सुवर्णसंधी!

Jan 22, 2024 02:01 PM IST

Travel Tips: यंदा तुम्हाला जर स्वस्तात मस्त परदेशी ट्रिप करायची असेल तर IRCTC ने तुमच्यासाठी एक खास पॅकेज आणले आहे. चला जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती.

 Nepal IRCTC Tour Package
Nepal IRCTC Tour Package (Unsplash)

IRCTC Nepal Tour Package: जर तुम्ही यंदाच्या वर्षी परदेशवारी करण्याचा विचार करत असाल तर आयआरसीटीसी तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आली आहे. अलीकडेच आयआरसीटीसीने नेपाळ टूरचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजशी संबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यामध्ये तुम्ही फेब्रुवारीमध्ये नेपाळ जाण्याचा प्लॅन करू शकता. फेब्रुवारीपासून हवामान थोडे आल्हाददायक होऊ लागते. अशा परिस्थितीत हा महिना प्रवासासाठी एकदम उत्तम ठरतो. हे टूर पॅकेज किती दिवसांचे आहे आणि त्यासाठी किती पैसे खर्च करावे लागतील हे जाणून घेऊयात.

तुम्हाला नेपाळच्या सुंदर दऱ्या जवळून पाहायच्या असतील आणि कमी बजेटमध्ये येथील सुंदर दृश्ये पाहू शकाल. या प्रवासासाठी किती पैसे खर्च करावे लागतील आणि तुम्ही ते कसे बुक करू शकता हे देखील जाणून घ्या.

जाणून घ्या डिटेल्स

पॅकेजचे नाव- Best of Nepal Ex Delhi

पॅकेज कालावधी- ५ रात्री आणि ६ दिवस

प्रवास मोड- फ्लाइट

डेस्टिनेशन कवर्ड-- काठमांडू, पोखरा

प्रवासाची तारीख– १६ फेब्रुवारी २०२४ आणि २८ फेब्रुवारी २०२४

काय सुविधा मिळतील?

> तुम्हाला प्रवासासाठी इकॉनॉमी क्लासचे तिकीट मिळेल.

> राहण्यासाठी हॉटेल सुविधा उपलब्ध असतील.

> या पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीचे जेवण उपलब्ध असेल.

> तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधाही मिळेल.

> ट्रिपसाठी एक टूर गाईडही तुमच्यासोबत असेल.

प्रवासासाठी किती पैसे लागतील?

> या ट्रिपमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला ४५,७०० रुपये मोजावे लागतील.

> दोन लोकांसाठी प्रति व्यक्ती ३७,०० रुपये शुल्क भरावे लागेल.

> तीन लोकांना प्रति व्यक्ती ३६,५०० रुपये फी भरावी लागेल.

> मुलांसाठी वेगळे शुल्क भरावे लागेल. बेडसाठी (५-११ वर्षे) तुम्हाला २६,५०० रुपये द्यावे लागतील आणि बेडशिवाय तुम्हाला २३,५०० रुपये द्यावे लागतील.

तुम्ही कसे करू शकता बुकिंग?

तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, IRCTC पर्यटक सुविधा केंद्र आणि ऑफिसमधून बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

Whats_app_banner