मराठी बातम्या  /  Lifestyle  /  Know Best Fruits To Eat While Fasting In Chaitra Navratri

चैत्र नवरात्रीच्या उपवासात खा ही ५ फळं, जाणवणार नाही अशक्तपणा

उपवासात खाण्यासाठी बेस्ट फळं
उपवासात खाण्यासाठी बेस्ट फळं (unsplash)
Hiral Shriram Gawande • HT Marathi
Mar 27, 2023 01:14 PM IST

Chaitra Navratri 2023: उपवासाच्या वेळी खाल्लेल्या फळांमुळे शरीर हायड्रेटेड, एनर्जी आणि पोट भरलेले राहते. अशा परिस्थितीत चला जाणून घेऊया नवरात्रीच्या उपवासात कोणती फळे खाणे उत्तम आहेत, जी तुमचे आरोग्य राखण्याचे काम करतात.

Best Fruits To Eat While Fasting: नवरात्रीच्या काळात अनेक लोक संपूर्ण ९ दिवस उपवास करतात. या काळात उपवास करणारी व्यक्ती शरीरात ऊर्जा टिकवण्यासाठी फराळाचे पदार्थ आणि अनेक प्रकारची फळे खातात. उपवासाच्या वेळी खाल्लेल्या फळांमुळे शरीर हायड्रेटेड, एनर्जी आणि पोट भरलेले राहते. अशा परिस्थितीत चला जाणून घेऊया नवरात्रीच्या उपवासात कोणती फळे खाणे बेस्ट आहेत, जी तुमचे आरोग्य राखण्याचे काम करतात.

ट्रेंडिंग न्यूज

फळांमध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे, अँटी ऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स व्यतिरिक्त भरपूर प्रमाणात फायबर देखील असते, जे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवतात. ज्यामुळे बद्धकोष्ठता दूर करण्यात मदत होते. फळे आणि भाज्यांचे नियमित सेवन केल्यास मधुमेहापासून हृदयरोगापर्यंतचे अनेक आजार टाळता येतात. उपवास करताना काही फळे इतरांपेक्षा अधिक उपयुक्त असतात. ज्याचे सेवन केल्याने शरीरातील उर्जेची पातळी चांगली राहण्यास मदत होते. अशा परिस्थितीत जाणून घेऊया त्या फळांबद्दल, जे केवळ उपवासाच्या वेळी तुम्हाला हायड्रेट ठेवत नाहीत तर तुमच्या शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व प्रदान करण्यात मदत करतात.

टरबूज

नवरात्रीच्या उपवासात टरबूज खाणे खूप फायदेशीर आहे. टरबूजमध्ये ९० टक्के पाणी असते, जे डिहायड्रेशनच्या समस्येपासून संरक्षण करू शकते. हे फळ केवळ तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करत नाही तर ते खाल्ल्याने तुमचे पोटही दीर्घकाळ भरलेले राहते.

केळी

जास्त कॅलरीज टाळण्यासाठी केळी हे सर्वोत्तम फळ मानले जाते. हे फळ तुमची ऊर्जा वाढवून भुकेची भावना कमी करते. केळी फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी ६ तसेच अनेक अँटी ऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे.

सफरचंद

सफरचंद हे अशा फळांपैकी एक आहे, ज्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. तुमची रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासोबतच सफरचंद उपवासाच्या वेळी बद्धकोष्ठता देखील टाळतात.

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीमध्ये ९१ टक्के पाणी असते आणि त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीसायनिन मुबलक प्रमाणात असते. व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून, ते त्याला सर्दी, फ्लू सारख्या मौसमी संसर्गापासून दूर ठेवतात.

संत्री

संत्री व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे. शरीराला ऊर्जा देण्यासोबतच रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यासही मदत होते. संत्र्यामध्येअसलेले फायबर मधुमेहाची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. याशिवाय यामध्ये असलेल्या फायबरचे प्रमाण बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel