Health Benefits of Flaxseed Oil: जवसाच्या बिया म्हणजे फ्लेक्स सीड्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. विशेषत: महिलांनी या बियांचा आहारात समावेश जरूर करावा. पण केवळ फ्लेक्स सीडच नाही तर त्याचे तेलही फायदेशीर आहे. जवसाचे तेल आहारात घेतले तर ते बियाइतकेच फायदेशीर ठरते. जर तुम्ही दररोज तुमच्या आहारात जवसाच्या तेलाचा वापर केला तर तुम्हाला बद्धकोष्ठता आणि हृदयाच्या आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. पण याचे सेवन करण्यापूर्वी ते वापरण्याची योग्य पद्धत माहीत असणे आवश्यक आहे. जवसाचे तेल कसे वापरावे आणि त्याचे फायदे जाणून घ्या.
फ्लेक्स सीड ऑइलमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते. एक चमचा जवसाच्या तेसामध्ये ७१९६ मिलीग्राम ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. याशिवाय या तेलामध्ये अल्फा लिनोलेनिक अॅसिड असते, जे महिला आणि पुरुषांसाठी आवश्यक आहे. रोज एक चमचा जवसाचे तेल घेतल्याने याची पूर्ती होते. ओमेगा ३ फॅटी अॅसिड हृदयाच्या आरोग्यासाठी आणि मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. जर तुम्ही फिश ऑइल किंवा फॅटी फिश घेत असाल तर फ्लेक्स सीड ऑइल हे ओमेगा ३ फॅटी अॅसिडचे उत्तम सप्लीमेंट आहे.
बद्धकोष्ठतेच्या समस्येवर जवसाचे तेल फायदेशीर आहे. अभ्यासात असे दिसून आले आहे की फ्लेक्स सीड तेल लॅक्सेटिव्ह असते आणि आतड्याची हालचाल सुलभ करण्यात मदत करते.
जर जवसाचे तेल १२ आठवडे दररोज घेतले तर ते त्वचेचे आरोग्य देखील सुधारते. अभ्यासात हे स्पष्ट झाले आहे की यामुळे त्वचेचे टेक्सचर स्मूथ होतो आणि हायड्रेशन वाढते. या व्यतिरिक्त त्वचेची जळजळ, संवेदनशीलता आणि कोरडेपणा दूर होतो.
फ्लेक्स सीडचे तेल हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अभ्यासानुसार दररोज १५ मिली जवसाचे तेल घेतल्यास ते रक्तदाब कमी करण्यास मदत करते. याशिवाय हे तेल रक्तवाहिन्या लवचिक बनवते. त्यामुळे रक्तदाबाची पातळी योग्य राहते.
हेल्थलाइनच्या अहवालानुसार जवसाचे तेल कर्करोगाच्या पेशी तयार होण्यास प्रतिबंध करते. यासोबतच जवसाचे तेल शरीरातील सूज थांबवते.
स्वयंपाकासाठी जवस तेल वापरणे योग्य नाही. हे तेल जास्त तापमानात जाळल्यावर हानिकारक ठरते. त्यामुळे स्वयंपाक करण्याऐवजी फ्लेक्स सीडचे तेल स्मूदी किंवा शेकमध्ये मिसळून घेणे अधिक फायदेशीर ठरते. याशिवाय सॅलड ड्रेसिंग, डिप्स किंवा सॉसमध्ये फ्लेक्स सीड तेल वापरता येते. जेणेकरून शरीराला त्याचे सर्व फायदेशीर गुण सहज मिळू शकतील. त्वचेच्या फायद्यासाठी जवसाचे तेल थेट त्वचेवर लावता येते. हे त्वचेचे आरोग्य सुधारते आणि मॉइश्चरायझेशन करते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या