Mental Health: तुमच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवू शकतात हे ५ पदार्थ, खाण्यापूर्वी एकदा विचार करा
Healthy Eating Tips: आजच्या काळात बहुतांश लोक तणाव, चिंता आणि नैराश्य यासारख्या मानसिक समस्यांनी वेढलेले असतात. याचं एक कारण तुमच्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी असू शकतात.
Food That Affects Mental Health: आहाराचा व्यक्तीच्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. अन्न देखील एखाद्या व्यक्तीचा मूड बनवू आणि खराब करू शकते. आयुर्वेदानुसार व्यक्ती ज्या प्रकारचे अन्न खातो त्याचा त्याच्या मानसिक आरोग्यावर तितकाच परिणाम होतो. आजच्या काळात बहुतेक लोक तणाव, चिंता आणि नैराश्य यासारख्या मानसिक समस्यांनी वेढलेले आहेत. याचं एक कारण तुमच्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीही असू शकतात. जर तुम्हाला ऐकायला विचित्र वाटत असेल तर तुम्हाला असे ५ पदार्थ सांगत आहोत, ज्याचा तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो.
ट्रेंडिंग न्यूज
Blood Sugar Level: काही लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी सतत कमी जास्त का होते?
मानसिक आरोग्याला हानी पोहोचवणारे फूड्स
अल्कोहोल
अल्कोहोल मेंदूत सेरोटोनिन आणि न्यूरोट्रांसमीटरची सक्रियता बदलते, ज्यामुळे चिंता आणि तणाव वाढतो. मद्यपान केल्याने व्यक्ती चिडचिडी राहते. जर तुम्हाला तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर मद्यपान बंद करा.
कॅफिन
डोकेदुखीची तक्रार करताना तुम्ही अनेकदा लोकांना चहा किंवा कॉफी पिताना पाहिलं असेल. परंतु तुम्हाला माहित आहे का की चहा आणि कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनचे प्रमाण तणाव किंवा स्ट्रेसची पातळी वाढवू शकते? तणाव कमी करण्यासाठी तुम्ही चहा किंवा कॉफीऐवजी हर्बल टी, नारळ पाणी, ग्रीन टी किंवा पुदिनाच्या चहा पिऊ शकता.
Anger Control: छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतो? आयुर्वेदात सांगितलेल्या या ड्रिंक्सने करा नियंत्रित
मीठ
मीठाचे जास्त सेवन केल्याने सुद्धा तुमच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचू शकते. मीठ शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते. ज्यामुळे थकवा आणि मानसिक आरोग्य बिघडते.
रिफाइंड कार्बोहाइड्रेट
रिफाइंड कार्बोहाइड्रेट अन्न जास्त प्रमाणात सेवन केल्याने व्यक्ती हृदय, मधुमेह आणि लठ्ठपणाचा बळी ठरू शकते. एवढेच नाही तर अशा अन्नाचे अतिसेवन केल्याने व्यक्ती मानसिक आजारांनाही बळी पडते. अशा परिस्थितीत तुमचे मानसिक आरोग्य राखण्यासाठी व्हाईट ब्रेड, पांढरा भात, साखर, सिरप, मिठाईचे पदार्थ, स्नॅक्स, पास्ता इत्यादी गोष्टींपासून दूर राहा किंवा त्यांचे मर्यादित प्रमाणात सेवन करा. मानसिक आरोग्य संस्थांनी केलेल्या अभ्यासात संशोधकांचे म्हणणे आहे की रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचे सेवन करणाऱ्यांना चिंता आणि नैराश्याचा धोका वाढतो.
एडेड शुगर
साखरयुक्त पदार्थांमुळे रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतारासह मूडची समस्या देखील होऊ शकते. अशा परिस्थितीत फळांचे ज्यूस, जॅम, केचअप आणि सॉस असे सर्व पदार्थ टाळावेत ज्यात साखरेचे प्रमाण जास्त असते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)