मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Healthy Eating Tips: पपई खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका या ५ गोष्टी, आरोग्यावर होईल परिणाम

Healthy Eating Tips: पपई खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका या ५ गोष्टी, आरोग्यावर होईल परिणाम

Hiral Shriram Gawande HT Marathi
Sep 21, 2023 02:26 PM IST

Papaya Eating Tips: आयुर्वेदानुसार पपई खाल्ल्यानंतर काही गोष्टी खाण्यास मनाई केली आहे. यांचे सेवन केल्याने फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.

पपई खाल्ल्यानंतर या गोष्टी खाणे टाळावे
पपई खाल्ल्यानंतर या गोष्टी खाणे टाळावे (unsplash)

Food Should Not Consumed After Eating Papaya: चेहऱ्याची चमक वाढवणे असो किंवा पचनशक्ती चांगली ठेवणे असो, पपई हे प्रत्येक आजारावर उपचार मानले जाते. पपईमध्ये असलेले व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम, व्हिटॅमिन-ए यासारखे पोषक तत्व नकळत आरोग्यासाठी अनेक फायदे देतात. आरोग्यासाठी इतके फायदेशीर असूनही तुम्हाला पपई खाण्याची योग्य पद्धत माहित नसेल तर हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आयुर्वेदानुसार पपई खाल्ल्यानंतर काही गोष्टी खाण्यास मनाई आहे. यांचे सेवन केल्याने व्यक्तीला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. चला अशाच ५ गोष्टींबद्दल जाणून घेऊया, ज्या पपई खाल्ल्यानंतर टाळल्या पाहिजेत.

ट्रेंडिंग न्यूज

पपई खाल्ल्यानंतर या गोष्टींचे सेवन टाळा

थंड पाणी

पपई खाल्ल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्यास ते तुमच्या शरीराला हानी पोहोचवू शकते. वास्तविक असे केल्याने चयापचय मंदावल्यामुळे पचनाच्या समस्या देखील उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत पपई खाल्ल्यानंतर चांगले पचन होण्यासाठी थंड पाण्याऐवजी कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

दुग्धजन्य पदार्थ

पपईसोबत दूध, पनीर, लोणी किंवा दही यांसारखे दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या होते. पपईसोबत दूध, दही किंवा इतर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्यास पचनसंस्थेवर परिणाम होतो. यामुळे गॅस, ब्लोटिंग किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या उद्भवू शकतात.

काकडी

पपईसोबत काकडी खाल्ल्याने पोट फुगणे, सूज, पोटात क्रॅम्प आणि जुलाब यांसारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. वास्तविक काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि त्याचे सेवन केल्याने शरीरात जास्त पाणी साचू शकते. त्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

आम्लयुक्त पदार्थ

संत्री, द्राक्षे, लिंबू, टोमॅटो यांसारख्या आम्लयुक्त पदार्थांसोबत पपई खाणे हानिकारक ठरू शकते. असे केल्याने तुम्हाला छातीत जळजळ, अॅसिड रिफ्लक्स किंवा इतर पचन समस्या होऊ शकतात.

 

अंडी

पपई खाल्ल्यानंतर चुकूनही अंडी खाऊ नका. दोन्ही एकत्र सेवन केल्याने अपचन, मळमळ, बद्धकोष्ठता आणि उलट्या इत्यादी पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel