मराठी बातम्या  /  Lifestyle  /  Know About 12 March History

On This Day: दांडी यात्रा सुरू होण्याचा दिवस ते अन्य महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे १२ मार्च!

Today's History
Today's History (Freepik)
Tejashree Tanaji Gaikwad • HT Marathi
Mar 12, 2023 10:01 AM IST

History of 12 March: १२ मार्चच्या इतिहासात देश आणि जगाशी संबंधित अनेक घटनांचा समावेश आहे.

12 March Historical Events: १२ मार्च या तारखेला इतिहासात नोंदवलेल्या प्रमुख घटनांमध्ये १९३० मध्ये सुरू झालेल्या 'दांडी यात्रा'चा समावेश आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी या दिवशी अहमदाबाद येथील साबरमती आश्रमातून मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडीयात्रेला सुरुवात केली. अशा अनेक महत्त्वाच्या घटना १२ मार्च रोजी घडल्या.

ट्रेंडिंग न्यूज

आजचा इतिहास

१७९९: ऑस्ट्रियाने फ्रान्सविरुद्ध युद्ध घोषित केले.

१८७२: लॉर्ड मेयोची हत्या करणाऱ्या शेर अलीला फाशी देण्यात आली.

१९३०: गांधींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी अहमदाबाद येथील साबरमती आश्रमातून दांडी पदयात्रा सुरू केली. यासोबतच त्यांनी सविनय कायदेभंगाची चळवळही सुरू केली आणि लोकांना ब्रिटिश राजवटीला कर न भरण्यास सांगितले.

१९३८: जर्मनीने ऑस्ट्रियावर हल्ला केला.

१९४२: दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीश सैन्याने अंदमान बेटे रिकामी केली.

१९५४: भारत सरकारने साहित्य अकादमीची स्थापना केली.

१९६०: भारतीय गूढवादी, लेखक आणि संस्कृत विद्वान क्षितीमोहन सेन यांचे निधन.

१९६७: इंदिरा गांधी दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान झाल्या.

१९९३: मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात शेकडो लोक मारले गेले.

१९९९: विसाव्या शतकातील प्रसिद्ध व्हायोलिन वादक ज्यू मनुहिन यांचे निधन झाले.

२००३: बेलग्रेडमध्ये सर्बियन पंतप्रधान जोरान जिंडिक यांची हत्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. )

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग