
Budget Friendly Christmas Gift Ideas for Kids: वर्षाच्या शेवटी येणारा सण म्हणजे ख्रिसमस, याची मुले आतुरतेने वाट पाहत असतात. कारण या दिवशी त्यांना त्यांच्या प्रियजनांकडून गिफ्ट मिळतात. मुलांच्या काल्पनिक जगात त्यांना वाटते की सांताक्लॉज त्यांना गिफ्ट देतो. म्हणूनच ते त्याची वाट पाहत असतात. या दिवशी पालक आपल्या मुलांना गिफ्ट देऊन सरप्राइज करतात आणि त्यांचा दिवस अविस्मरणीय बनवतात. आता मुलांना कोणते गिफ्ट द्यायचे याबाबत अनेक वेळा पालक कंफ्यूज होतात. तुम्हालाही मुलांना आवडेल आणि बजेटमध्ये असेल असे एखादे गिफ्ट घ्यायचे असेल तर मुलांसाठी खास गिफ्ट आयडिया येथे पाहा. तुम्ही हे मुलांना ख्रिसमला देऊन त्यांना सरप्राइज देऊ शकता.
प्रत्येत मूल हे वेगळे असते. काही मुलांना प्रवासाची आवड असते आणि त्यांना जगातील नैसर्गिक आश्चर्ये शोधायला आवडतात. तुमच्या मुलांना सुद्धा अशी आवड असेल तर तुम्ही त्यांना दुर्बीण भेट देऊ शकता. दुर्बिणीचे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटमध्ये राहून त्या खरेदी करू शकता.
मुलांना लहान वयातच मोठ्यांसारखे घड्याळ घालायला आवडते. अशा स्थितीत तुम्ही ख्रिसमसनिमित्त मुलांना स्मार्ट वॉच गिफ्ट करु शकता. याद्वारे तो त्याच्या फिटनेसशी संबंधित गोष्टी पाहू शकतो. या प्रकारचे घड्याळ त्यांना एक प्रकारे अॅक्टिव्ह राहण्यास आणि फिट राहण्यास, व्यायाम करण्यास प्रेरणा देईल.
तुम्ही तुमच्या मुलाला कलर बुक्स भेट देऊ शकता. अशी पुस्तके त्याला व्यस्त आणि आनंदी ठेवतील. शिवाय त्यांच्यातील कला देखील जोपासली जाईल. वेगवेगळ्या वयोगटातील मुलांना कलर बुक्स दिली जाऊ शकतात. तुमच्या मुलाच्या वयानुसार एक निवडा आणि त्यासोबत रंग भेट द्या.
पालक हिवाळ्यात मुलांना गरम पाणी देतात. मुलांना हे आवडत नाही. अशा परिस्थितीत जर तुम्ही त्यांना पर्सनल पाण्याची बॉटल दिली तर त्यांना गरम पाणी पिण्यास मदत करेल. या प्रकारच्या बॉटलमध्ये झाकणाच्या वरच्या बाजूला पाण्याचे तापमान दिसते. तसेच गरम पाणी टाकल्यावर पाण्याचा रंग बदलणाऱ्या किंवा डिझाईन बदलणाऱ्या मॅजिक बॉटल सुद्धा देऊ शकता.
मुलांना शिक्षणासह मनोरंजनाची जोड देणारी खेळणी भेट म्हणून देता येतात. इंटरएक्टिव्ह गॅझेट्स, कोडिंग किट किंवा पझल मुलांना खेळण्यासोबतच शिकण्यास मदत करतात. असेच काही सायन्स किंवा मॅकनिक टूल किट सुद्धा देता येतात. त्यांच्या वयानुसार गेम्स निवडावे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या
