Easy Garlic Peeling Hack: भारतीय स्वयंपाकघरात लसूण हा पदार्थ नेहमीच आढळतो. लसूण जेवणाची चव वाढवतो. डाळ किंवा भाजीला लसणाची फोडणी दिल्याशिवाय आपला आत्मा तृप्त होत नाही. असं नेहमीच म्हटलं जातं. त्याशिवाय लसूण अनेक औषधी गुणांनीयुक्त आहे. आरोग्याला त्याचे अनेक फायदे आहेत.
परंतु लसणाच्या लहान-लहान पाकळ्या सोलणे हे तितकेच कठीण आणि वेळखाऊ काम वाटते. त्यांना सोलण्यात बराच वेळ जातो आणि त्यामुळे हे काम अनेकांना त्रासदायक ठरत आहे. जर तुम्हीही या त्रासाने त्रस्त असाल. आणि लसूण सोलण्याचा सोपा उपाय शोधत असाल तर आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. येथे आम्ही तुम्हाला एक अशी युक्ती सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही लसूण अगदी सहज आणि पटकन सोलू शकता. या युक्तीचा अवलंब केल्याने, तुमचा वेळ तर वाचेलच, पण स्वयंपाकघरातील तुमचे कामही सोपे होईल. चला तर मग पाहूया नेमकी पद्धत कोणती आहे.
-यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक मोठा चाकू लागेल. चाकूच्या मदतीने लसणाच्या पाकळ्या वरच्या बाजूने अर्ध्या कापून घ्या. त्यानंतर, लसणाच्या पाकळ्या अशा प्रकारे ठेवा की, कापलेला भाग तळाशी असेल.
-आता चाकूची सपाट बाजू लसणावर ठेवा आणि हलक्या हाताने प्रेस करा अर्थातच दाबा. असे केल्यावर लसणाच्या पाकळ्याचे साल लगेच वेगळे होतील आणि सर्व लसूण बाहेर निघतील. त्यामुळे तुम्हाला अजिबात वेळ खर्च करायची गरज नाही.
- या कामासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त ४ ते ५ सेकंदांचा वेळ लागणार आहे. अशा प्रकारे तुम्ही एका मिनिटात संपूर्ण लसूण सोलून काढू शकता. या नवीन तंत्राने तुम्ही एकाच वेळी अनेक लसणाच्या पाकळ्या सोलू शकता आणि तेही कोणत्याही कंटाळयाशिवाय.
-जर तुम्ही लसूण सोलण्याची ही पद्धत अवलंबली तर लसूण सोलण्याचे काम तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही. शिवाय तुमचा जास्तीचा वेळही वाया जाणार नाही. आणि तुम्ही तुमचे स्वादिष्ट, आवडीचे पदार्थ अधिक लवकर तयार करू शकाल. पुढच्या वेळी तुम्हाला लसूण सोलायचा असेल, तेव्हा ही हॅक वापरून पाहा. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होऊ शकतो.