Kitchen Tips: पोळी लाटताना लाटण्याला चिकटते? ट्राय करा शेफ पंकजचे हे उपाय
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kitchen Tips: पोळी लाटताना लाटण्याला चिकटते? ट्राय करा शेफ पंकजचे हे उपाय

Kitchen Tips: पोळी लाटताना लाटण्याला चिकटते? ट्राय करा शेफ पंकजचे हे उपाय

Jan 16, 2024 11:09 PM IST

Kitchen Hacks: पोळी लाटताना अनेक वेळा लाटण्याला चिकटते. यासाठी मास्टर शेफ पंकज यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात त्यांनी दोन सोप्या टिप्स सांगितल्या आहेत.

किचन टिप्स
किचन टिप्स

Tips to Prevent Dough From Sticking To Rolling Pin: महिलांना स्वयंपाक करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जेवण टेस्टी व्हावे यासाठी त्या विविध कुकिंग टिप्स आणि ट्रिक्स शोधत असतात. तसेच स्वयंपाक करताना येणाऱ्या अडचणी कमी व्हाव्या, स्वयंपाक झटपट तयार व्हावे यासाठी सुद्धा बऱ्याच टिप्स पाहिल्या जातात. अशीच एक अडचण म्हणजे पोळी आणि पराठा बनवताना अनेक वेळा दिसून येते. बर्‍याच वेळा स्त्रिया तक्रार करतात की पोळी किंवा पराठा बनवताना लाटण्याला पीठ चिकटल्यामुळे लाटलेली पोळी खराब होते. तुमच्या सोबतही असे कधी घडले असेल तर मास्टर शेफ पंकजच्या या प्रभावी टिप्स फॉलो करा. शेफ पंकजने त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि पोळी लाटताना पीठ लाटण्याला चिकटू नये यासाठी दोन सोप्या टिप्स शेअर केल्या आहेत. तुम्हीही या टिप्स फॉलो करून तुमच्या समस्येवर मात करून काम सोपे करू शकता.

पोळी बनवताना पीठ लाटण्याला चिकटले तर फॉलो करा या टिप्स

तेल

पोळी लाटताना पीठ तुमच्या लाटण्याला चिकटू नये म्हणून तुम्ही तेलाची मदत घेऊ शकता. ही टीप फॉलो करण्यासाठी सर्वप्रथम लाटण्यावर तेलाचे काही थेंब टाका आणि लाटण्याला चांगले घासून घ्या. असे केल्याने पोळी किंवा पराठा लाटताना पीठ लाटण्याला चिकटणार नाही.

फ्रिजचा वापर

शेफ पंकजची ही दुसरी रेमिडी फॉलो करण्यासाठी तुम्हाला फ्रिजची गरज आहे. या टिपमध्ये शेफ पंकज सांगतात की पोळी बनवण्यापूर्वी तुमची लाटणे अर्ध्या तासासाठी फ्रिजमध्ये ठेवा. असे केल्याने पोळी लाटताना तुमचे पीठ लाटण्याला चिकटणार नाही.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner