पावसाळा सुरु झाला की वातावरणात थंडावा निर्माण होतो. पण पडणाऱ्या पावसामुळे घरातील भिंतीवर ओल्या होतात. संपूर्ण घराता ओलावा निर्माण होतो. यामुळे स्वयंपाकघरातील अनेक वस्तू या खराब होऊ लगातात. मसाले असोत की कॉफी, बिस्किटे, स्नॅक्स अशा अनेक गोष्टी ओलाव्यामुळे खराब होऊ लागतात आणि डाळ वगैरे देखील खराब होते. या वस्तू साठवण्यासाठी काही सोप्या टिप्स तुम्हाला सांगत आहोत ज्यामुळे पावसाळ्यात धान्य खराब होणार नाही.
पावसाळ्यात सामान ठेवण्यासाठी एअरटाइट कंटेनरचा वापर करा. सामान खूप लवकर खराब होत असेल तर डब्याचे तोंड एकदम घट्ट बंद करा. यामुळे डब्यातील ओलावा कमी होऊन वस्तू बराच वेळ टिकतील.
वाचा: लंच बॉक्समधून बाहेर येतात भाज्या किंवा तेल? 'या' सोप्या उपायांनी करा तुमचा टिफीन एअरटाइट
कॉफीला ओलाव्यापासून वाचवायचे असेल तर तांदळाचे काही दाणे नॅपकिनमध्ये गुंडाळून डब्यात टाका. यामुळे कॉफीमध्ये ओलावा निर्माण होणार नाही. तसेच, कॉफीमध्ये स्टीलचा चमचा कधीही टाकू नका आणि कॉफी जेव्हा हवी असेल तेव्हा चमच्याच्या मदतीने काढा. स्टीलच्या चमच्याच्या थंडपणामुळे कॉफीमध्ये ओलावाही निर्माण होतो.
बिस्किटे पॅकेटसह बॉक्समध्ये ठेवा आणि साखरेचे थोडे दाणे घाला. यामुळे बिस्किटांना लवकर ओलावा खावा लागत नाही.
वाचा: पावसाळ्यात घराचे छत गळतय, फनिर्चरला बुरशी येतेय? वाचा कशी घ्यावी काळजी
डाळ, मूगापासून हरभरा राजमा पर्यंत डाळींच्या सर्व डब्यामध्ये तमालपत्र घालून एक-दोन माचिस त्यात टाका. यामुळे डाळी खराब होणार नाहीत. पण पिठाच्या डब्यात मात्र केवळ तमालपत्र घालावे.
पावसाळ्यात रवा आणि दलिया लवकर खराब होताता. म्हणून पावसाळा येण्यापूर्वी दोन्ही गोष्टी थोड्या भाजून ठेवाव्यात. यामुळे ते जास्त काळ टिकण्यास मदत होते. तसेच त्यामध्ये किड देखील होणार नाही.
Haunted Places Of India: 'ही' आहेत भारतातील सर्वात भीतीदायक ठिकाणे, जाण्यापूर्वी नक्की विचार करा
बहुतेक घरांमध्ये मसाले थेट मसाल्याच्या डब्यात ठेवले जातात. त्यामुळे मसाले एकाच डब्यात ठेवल्यास कंटेनर रबरबँडने पॅक करा. उघडा आणि गरजेनुसार वापरा. जेणेकरुन पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे ते खराब होणार नाहीत.
संबंधित बातम्या