Tips to remove wrinkles from clothes without ironing: ऑफिसमध्ये जाणारे लोक असो किंवा शाळा, कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी सर्वांनाच कडक इस्त्री केलेले कपडे घालायला आवडते. कपडे भलेही जुने असूदेत परंतु कडक इस्त्री केल्याने त्याला एक वेगळीच चमक येते. त्यामुळेच बहुतांश लोक दररोज इस्त्री केलेले कपडे घालणे पसंत करतात. परंतु दररोज इस्त्री करणे अनेकांना शक्य होत नाही. शिवाय दररोज ते काम करणे अनेकांना वेळखाऊ आणि वैताग देणारा वाटतो. काही कपडे असे असतात जे आपण इस्त्री न करता आरामात परिधान करू शकतो. मात्र काही कपडे असे असतात ज्यांना इस्त्री करणे गरजेचे असते. अथवा ते फारच खराब दिसतात.
सर्वसाधारणपणे जेव्हा आपण कपडे धुतो, तेव्हा ते आकसतात त्यावर प्रचंड सुरकुत्या पडतात. अशा स्थितीत कपड्यांवरील सुरकुत्या काढण्यासाठी सर्वजण इस्त्री करणे [पसंत करता. पण दररोजच्या घाईमुळे किंवा व्यस्त जीवनशैलीमुळे असे करणे शक्य होत नाही. जर तुम्ही दररोज कपडे इस्त्री करू शकत नसाल, तर अशा परिस्थितीत कपडे लॉंड्रीमध्ये देणे भाग पडते. परंतु, तुमचे कपडे धुताना आणि वाळवताना तुम्ही काही स्टेप्स फॉलो केल्यास तुमच्या कपड्यांवर अजिबात सुरकुत्या पडणार नाहीत. आणि त्यामुळे तुम्हाला इस्त्रीसुद्धा करावी लागणार नाही. पाहूया या टिप्स नेमक्या कोणत्या आहेत.
-नेहमीच कपडे थंड पाण्यात धुवा. कारण गरम पाण्यात कपडे धुतल्याने आकुंचन निर्माण होते आणि पुन्हा इस्त्री करावी लागते.
- कपडे लवकर धुवा. कारण जास्तवेळ कपडे भिजत ठेवल्याने कपड्यांवर सुरकुत्या दिसू लागतात. आणि नंतर त्या सुरकुत्या इस्त्री केल्याशिवाय घालवता येत नाहीत.
-जास्त हार्ड केमिकलयुक्त डिटर्जंटने कपडे धुणे टाळा. यामुळे कपड्यांमध्ये सुरकुत्या पडू शकतात, ज्या केवळ इस्त्रीनेच दुरुस्त केल्या जाऊ शकतात.
- कपडे धुतल्यानंतर पाणी काढण्यासाठी ते जास्त वेळ पिळू नका. यामुळेसुद्धा कपड्यांवर प्रचंड सुरकुत्या पडतात. त्यामुळे इस्त्री होते.
या टिप्सनुसार जर तुमची इस्त्री खराब झालेली असेल, तर तुम्ही तुमचे कपडे गादीखालीदेखील ठेवू शकता. यामुळे कपड्यावरील सुरकुत्या बऱ्यापैकी दूर होतील. याशिवाय कपड्यांवरील सुरकुत्या घालवण्यासाठी टॉवेलचाही वापर करू शकता. यासाठी टेबलावर टॉवेल पसरवून त्यावर तुमचे कपडे पसरवा. नंतर, वर एक ओला टॉवेल ठेवा आणि खाली दाबा. अशाप्रकारे सुरकुत्या निघून जातील.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)