Simple Hacks to crack coconut: निरोगी राहण्यासाठी नारळ पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देत असतात. यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. नारळ इलेक्ट्रोलाइट्सचा मुख्य स्त्रोत आहे. कच्च्या नारळासोबत, सुके खोबरेदेखील आहे, जे बहुतेक लोक पूजा करताना वापरतात. नारळाची चटणी किंवा इतर अनेक गोष्टी बनवण्यासाठीही याचा वापर होतो. सुके खोबरेही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, नारळ फोडून त्यातील खोबरा बाहेर काढावा लागतो तेव्हा अडचण निर्माण होते. अनेक वेळा नारळ फोडताना हाताला दुखापतही होते. जर तुम्हालाही कडक नारळ फोडण्यासाठी तासन्तास मेहनत करावी लागत असेल तर ,आता या युक्तीने तुमचे काम सोपे होणार आहे.शेफ कुणाल कपूरने नारळ फोडण्याची ही सोपी पद्धत सांगितली आहे.
तुमचे काम सोपे करण्यासाठी प्रथम नारळाची साल अर्थातच शेंडी काढून टाका. नारळाची साले थोडी टणक असली तरी थोडी ताकद लावून ती सहज काढता येतात. ते आपल्या हातांनी नारळाच्या शेंड्यापासून पूर्णपणे वेगळे करा. लक्षात ठेवा नारळाची साल न काढता नारळ फोडणे फार कठीण आहे.
आता नारळाकडे काळजीपूर्वक पहा, तुम्हाला त्याच्या प्रत्येक बाजूला रेषा दिसतील. वास्तविक, सोलल्यानंतर, नारळावर तीन नैसर्गिक जाड रेषा दिसतात. शेफ कुणालच्या म्हणण्यानुसार, नारळाच्या रेषेवर जड वस्तूने मारल्यास ते सहज तुटते. अशा परिस्थितीत, तुम्हाला रोलिंग पिन किंवा हातोड्याने या रेषांवर घाव घालायचे आहे. असे २-३ वेळा केल्याने नारळाचे दोन तुकडे होतील.
नारळ फोडणे जितके अवघड आहे, तितकेच त्याला कवचातून बाहेर काढणेही अवघड आहे. हे काम सोपे करण्यासाठी शेफ कुणाल सांगतात की नारळ फोडल्यानंतर गॅसच्या शेगडीवर ३०-३५ सेकंद भाजून घ्या. असे केल्याने त्यातील ओलावा सुकतो. आता चाकूच्या साहाय्याने नारळाभोवती एक जागा तयार करा, जेणेकरून खोबरे काही मिनिटांतच कवचातून बाहेर येईल. अशाप्रकारे तुम्ही कोणतीही दुखापत न करून घेता नारळ फोडू शकता.