kitchen tips: काळ्या पडलेल्या गॅस बर्नरमुळे किचन दिसतंय अस्वच्छ? 'या' सोप्या उपायाने क्षणात होईल क्लीन-kitchen tips marathi simple tips to clean a dirty gas burner ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  kitchen tips: काळ्या पडलेल्या गॅस बर्नरमुळे किचन दिसतंय अस्वच्छ? 'या' सोप्या उपायाने क्षणात होईल क्लीन

kitchen tips: काळ्या पडलेल्या गॅस बर्नरमुळे किचन दिसतंय अस्वच्छ? 'या' सोप्या उपायाने क्षणात होईल क्लीन

Aug 07, 2024 03:37 PM IST

Tips to clean gas burner: गॅस बर्नर सहसा साफ करणे विसरून जातात. या गॅस बर्नर्सकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या छिद्रांमध्ये घाण साचू लागते आणि घाणीने ते काळे होऊ लागतात.

काळे पडलेले गॅस बर्नर साफ करण्यासाठी किचन टिप्स
काळे पडलेले गॅस बर्नर साफ करण्यासाठी किचन टिप्स

Tips to clean gas burner: मळकटलेल्या काळ्या गॅस बर्नरचा समावेश असल्याशिवाय स्वयंपाकघरातील स्वच्छता पूर्ण होतच नाही. स्वयंपाकघर साफ करताना महिला अनेकदा ठेवलेली भांडी, स्लॅब किंवा टाइल्सवर लक्ष ठेवतात. परंतु गॅस बर्नर सहसा साफ करणे विसरून जातात. या गॅस बर्नर्सकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या छिद्रांमध्ये घाण साचू लागते आणि घाणीने ते काळे होऊ लागतात. त्यामुळे अनेकवेळा गॅस बर्नरमधून आग व्यवस्थित बाहेर येत नाही आणि गॅस गळतीचा धोकासुद्धा निर्माण होतो.

गॅस बर्नर साफ करण्यासाठी महिलांना सहसा खूप वेळ लागतो. गॅस वापरणे जितके सोपे आहे, तितकेच ते स्वच्छ ठेवणे अवघड असते. त्यामुळे गॅस वापरताना लोक विशेष खबरदारी घ्यायला विसरत नाहीत. परंतु, अनेक वेळा टोमॅटो किंवा वांग्यासारख्या भाज्या थेट गॅसवर तळल्याने गॅस बर्नरच्या छिद्रात अडकतात. अशा स्थितीत बर्नर साफ न करता जळत्या गॅसमध्ये गळती होऊ शकते. पण आज आम्ही तुम्हाला जी किचन ट्रिक सांगणार आहोत, त्याच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत गॅस बर्नरला नवीन बनवू शकता. कसे ते आम्ही तुम्हाला सांगतो.

काळे पडलेले गॅस बर्नर साफ करण्यासाठी किचन टिप्स-

१) व्हिनेगर-

व्हिनेगर एक अशी आहे ज्याचा तुम्ही विविध प्रकारच्या क्लिनिंमध्ये वापर करू शकता. गॅस बर्नर साफ करण्यासाठीदेखील तुम्ही व्हिनेगर वापरू शकता. हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात व्हिनेगर आणि मीठ घालून मिक्स करून उकळवा. या पाण्यात काळे गॅस बर्नर टाका आणि थोडा वेळ ठेवा. या उपायाने, अस्वच्छ बर्नर नवीनसारखे चमकतील.

२) इनो-

इनोच्या वापराने तुम्ही ऍसिडिटीसारख्या पोटाच्या तक्रारी दूर करू शकता. शिवाय इनो सोल्यूशन गॅस बर्नर साफ करण्यासाठीदेखील खूप प्रभावी आहे. या किचन हॅकचे पालन करण्यासाठी, तुम्हाला एक वाटी गरम पाणी घ्यावे लागेल, त्यात लिंबू आणि इनो मिक्स करावे लागेल. हे द्रव बर्नरवर ओतून ठेवावे आणि काही वेळ तसेच सोडावे. यानंतर, ब्रशच्या मदतीने द्रव स्वच्छ करा, स्वच्छ पाण्याने धुवा आणि कोरड्या कापडाने वाळवा. आता तुमच्या गॅसचे बर्नर नव्यासारखे दिसेल.

३) लिंबू-

गॅस बर्नर साफ करण्यासाठी लिंबूचे द्रावणदेखील वापरले जाऊ शकते. हा उपाय करण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि त्यात बर्नर रात्रभर बुडवा. दुसऱ्या दिवशी सकाळी लिंबाच्या सालीत मीठ टाकून बर्नर साफ करा. या किचन हॅक्सचे पालन केल्याने गॅस बर्नर नवीन बर्नरप्रमाणे चमकू लागेल.

 

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग