Kitchen Tips: हिरव्या पालेभाज्या धुण्याची ही आहे योग्य पद्धत, अन्यथा शरीरात जातील कीटकनाशके
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kitchen Tips: हिरव्या पालेभाज्या धुण्याची ही आहे योग्य पद्धत, अन्यथा शरीरात जातील कीटकनाशके

Kitchen Tips: हिरव्या पालेभाज्या धुण्याची ही आहे योग्य पद्धत, अन्यथा शरीरात जातील कीटकनाशके

Published Feb 15, 2024 09:57 PM IST

Vegetable Cleaning Tips: रोजच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. पण या भाज्या नीट धुतल्या नाही तर ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते. हिरव्या पालेभाज्या धुण्यासाठी काय काळजी घ्यावी हे जाणून घ्या.

हिरव्या पालेभाज्या धुण्यासाठी टिप्स
हिरव्या पालेभाज्या धुण्यासाठी टिप्स (unsplash)

Right Way To Wash Green Leafy Vegetables: हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर पोषण असते. त्यामुळे आहारात पालेभाज्यांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. पालक, मेथी, चाकवत या पालेभाज्या आवडीने खाल्ले जाते. पण ते शिजवण्यापूर्वी खूप तयारी करावी लागते. या पालेभाज्या स्वच्छ करण्यासाठी सर्वाधिक वेळ द्यावा लागतो. या पालेभाज्या घाईत धुवून शिजवल्या तर त्यातील कीटकनाशके शरीरात जाण्याची भीती असते. त्यामुळे ते धुण्याची योग्य पद्धत जाणून घ्या. जेणेकरुन त्यातील सर्व आवश्यक पोषक तत्वे मिळतील शिवाय त्यावर असलेले बॅक्टेरिया आणि कीटकनाशके देखील शरीरात प्रवेश करू शकणार नाहीत.

पालेभाज्यांची मुळे आणि देठ वेगळे करा

बाजारातून पालेभाज्या आणल्यानंतर मुळे आणि देठ वेगळे करा. याच्या मदतीने तुम्ही पाने सहज धुवू शकता. तसेच निरुपयोगी घाण आधीच वेगळी केली जाईल.

थंड पाण्याने धुवा

सर्व पाने वेगळी करा आणि थंड पाण्याने धुवा. प्रत्येक पान पाण्यात चोळून स्वच्छ करा. जेणेकरून त्यांच्यावर साचलेली माती निघून जाईल. हिरव्या भाज्या धुण्यासाठी गरम पाणी वापरू नका. यामुळे पानांचे नुकसान होईल.

तुरटी किंवा व्हिनेगरमध्ये भिजवा

हिरव्या पालेभाज्या तुरटी टाकलेल्या पाण्यात काही वेळ भिजवा. किंवा पाणी आणि व्हिनेगरच्या सोल्युशनमध्ये भिजवा. त्यामुळे पानांवर जमा झालेली कीटकनाशके सहज स्वच्छ होतील.

पाणी पूर्णपणे काढून टाका

पाने धुतल्यानंतर पाणी पूर्णपणे काढून टाका. जेणेकरून हिरव्या भाज्या खराब होणार नाहीत आणि सर्व पानांचे पाणी सुकेल. यासाठी तुम्ही पेपर टॉवेल वापरू शकता. नंतर पाने पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवा.

अशा प्रकारे साठवा पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी त्यांना स्वच्छ करा आणि वाळवा. नंतर एखाद्या अशा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा, ज्यामध्ये हवा जाऊ शकते आणि ती ताजी राहते. किंवा पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner