Tips to Prevent Coffee and Salt from Moisture: पावसाळ्यात ओलावा वेगाने पसरतो. विशेषत: खाण्या-पिण्याच्या गोष्टींमध्ये ओलावा असेल तर त्या वस्तूंचे नुकसान होते. अनेकदा कॉफीचे जार, टेबलवर ठेवलेले मिठाचे डबे आणि बिस्किट-स्नॅक्समध्ये ओलावा येतो. यामुळे या गोष्टी लवकर खराब होतात. या वस्तूंना ओलाव्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता. ज्यामुळे आर्द्रतेची समस्या दूर होईल आणि या गोष्टी वाया जाण्यापासून ही बचाव होईल. चला तर मग जाणून घेऊया कॉफी किंवा मीठात ओलावा असेल तर काय करावे. या किचन टिप्स फॉलो करायला विसरू नका.
कॉफीच्या बरणीमध्ये ओलसरपणा असेल तर सर्व कॉफी निरुपयोगी ठरते. हे टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कॉफीमध्ये बाहेर ठेवलेले स्टीलचे चमचे कधीही टाकू नका किंवा कॉफीमध्ये ठेवलेला चमचा कधीही थेट पॅनमध्ये वापरू नका. त्याऐवजी चमच्याच्या साहाय्याने दुसऱ्या चमच्यावर कॉफी काढा आणि मग भांड्यात कॉफी घाला. यामुळे कॉफीवर वाफ आणि ओलावा येत नाही. तसेच कॉफी एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवावी. यामुळे कॉफीमध्ये ओलावा वाढणार नाही.
डायनिंग टेबलवर अनेकदा मिठाचे डबे किंवा छोटी बरणी असते. ज्यात छिद्र असतात. या छिद्रांमुळे ओलावा बरणीत जातो आणि त्यामुळे संपूर्ण मीठ खराब होते. मिठाच्या भांड्याला ओलसरपणा, ओलावा यापासून वाचवायचे असेल तर सर्वप्रथम मिठाच्या डब्यात एक ते दोन चमचे मीठ ठेवावे. तसेच मिठाच्या डब्यात एक चमचा तांदूळ घाला. यामुळे मिठात ओलावा निर्माण होणार नाही आणि सर्व मीठ सहज काढता येईल.
पावसाळ्यात बिस्किट प्लेटमध्ये काढल्यानंतर त्याला ओलावा लागत असेल तर नेहमी लहान आकाराची पाकिटे खरेदी करा. तसेच बिस्किटाच्या डब्यात थोड्या प्रमाणात साखर ठेवावी. यामुळे बिस्किटांमध्ये ओलावा येत नाही.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)