Tips to Keep Lady Finger Fresh for Longer Time: बऱ्याच लोकांची भेंडी ही आवडती भाजी असते. भेंडी बटाटा, कुरकुरीत भेंडी अशा विविध प्रकारे भेंडीची रेसिपी बनवून पराठा आणि भातासोबत खाल्ली जाते. भेंडी ही खायला चवदार भाजी असली तरी जेव्हा त्याच्या शेल्फ लाईफचा विचार केला जातो तेव्हा ती पटकन शिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण भेंडी खूप लवकर खराब होते. भेंडी दोन दिवस फ्रिजमध्ये ठेवल्याने ती चिकट होते आणि बाहेर ठेवल्याने ती कोरडी पडू लागते. अशा वेळी भेंडी ही तुमची आवडती भाजी असेल आणि ती आठवडाभर ताजी ठेवायची असेल तर या काही टिप्स तुम्हाला मदत करू शकतात. या काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही भेंडी दीर्घकाळ फ्रेश ठेवू शकता.
भेंडीला बराच वेळ फ्रेश ठेवण्यासाठी त्याला ओलाव्यापासून दूर ठेवणे गरजेचे आहे. यासाठी सर्वप्रथम बाजारातून भेंडी खरेदी करावी आणि घरी आणताच पसरवून त्यात असलेला ओलावा व पाणी वाळवावे. भेंडीत थोडे पाणी किंवा ओलावा असेल तर ती लवकर खराब होऊ शकते. भेंडी साठवण्यासाठी सुती कापडात गुंडाळून हवाबंद डब्यात ठेवावी. असे केल्याने भेंडी ओलाव्यापासून दूर राहून बराच काळ फ्रेश राहील.
भेंडी फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी पॉलिथिन किंवा भाज्या ठेवण्याच्या पिशवीत भरून फ्रिजमध्ये ठेवावी. यानंतर पिशवी किंवा पॉलिथिन फ्रेश ठेवण्यासाठी त्यात छिद्रे करून घ्यावीत. भेंडी एखाद्या टोपलीत साठवायची असेल तर आधी भाजीच्या टोपलीच्या तळाशी वर्तमानपत्र किंवा कागद ठेवावा. त्यानंतर भेंडी व्यवस्थित पद्धतीने टोपलीत ठेवावी.
सर्वोत्कृष्ट भेंडी पूसा ए-४ मानली जाते. त्याचा आकार मध्यम असून ती दिसायला डार्क ग्रीन रंगाची असते. या प्रकारच्या भेंडीमध्ये ग्लूटेन कमी असते. ज्यामुळे त्याची चव चांगली लागते आणि ती अनेक दिवस साठवून ठेवता येते. जास्त ओलावा असलेल्या कोणत्याही भाजी किंवा फळासोबत भेंडी साठवू नका. असे केल्याने दोन्ही गोष्टी लवकर सडू किंवा खराब होऊ शकतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या