Tips to Store Fruits: निरोगी राहण्यासाठी फळे खाणे महत्त्वाचे आहे. खनिजे आणि अत्यावश्यक पोषक तत्वांनी युक्त फळे अनेक लोक नियमित खरेदी करतात आणि खातात. फळे नियमित घरी आणली जातात पण ती लवकर खराब होऊ लागतात. अशा स्थितीत बाजारातून दररोज फळे घेणे अवघड होऊन बसते. पण जर फळे व्यवस्थित साठवली गेली तर ती जास्त काळ ताजी राहतील. योग्य पद्धतीने ते साठवले तर ते जास्त पिकून त्यात किडे, अळ्या होणार नाही. जाणून घ्या जास्त काळ फ्रेश राहण्यासाठी फळे कसे साठवायचे.
फळांवर भरपूर कीटकनाशके वापरलेली असल्याने फळे धुणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांशिवाय फळे विकणाऱ्या गाड्यांवर सुद्धा कीटकनाशके टाकून किडींपासून त्यांचे संरक्षण केले जाते. अशा परिस्थितीत फळे घरी आणल्यानंतर ते पूर्णपणे धुणे महत्वाचे आहे. फळे धुण्यासाठी व्हाईट व्हिनेगर, बेकिंग सोडा आणि तुरटी वापरा. फळे नीट धुवा आणि त्यातून कीटकनाशके काढून टाका.
फळे धुतल्यानंतर कापडाच्या साहाय्याने ते पूर्णपणे कोरडे केल्याची खात्री करा. जेणेकरून ओलावा शिल्लक राहणार नाही. ओलाव्यामुळे बॅक्टेरिया झपाट्याने वाढतात आणि फळे खराब करू लागतात.
फळे दीर्घकाळ ताजी ठेवण्यासाठी ते योग्य प्रकारे साठवणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक फळ स्वतंत्रपणे साठवा. केळी आणि एवोकॅडो सारखी फळे फ्रीजमधून बाहेर ठेवा. हिवाळ्यात सर्व फळे फ्रीजच्या बाहेर सहजपणे ठेवता येतात.
जर तुम्हाला फळे व्यवस्थित ताजी ठेवायची असतील तर त्यांना चिपकणाऱ्या फॉइलमध्ये गुंडाळून ठेवा. त्यामुळे रासायनिक क्रिया कमी होऊन फळे ताजी राहतील.
खरं तर फळे कापल्यानंतर ठेवण्याची सवय चांगली नाही. कारण त्यामुळे फळांमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात. पण जर तुम्हाला कापलेली फळे फ्रीजमध्ये ठेवायची असतील तर ती एअर टाईट डब्यात भरलेली आहेत याची खात्री करा. जेणेकरून त्यांचे शेल्फ लाइफ कायम राहते आणि ते खराब होणार नाहीत.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या