Tips to Soften Roti Dough After Refrigeration: उन्हाळ्यात लोक बहुतेकदा उरलेले पोळीचे कणिक किंवा पीठ फ्रीजमध्ये ठेवतात. फ्रीजच्या बाहेर ठेवलेले पीठ काही वेळातच आंबायला लागते आणि पोळ्या खराब होतात. पण समस्या अशी आहे की फ्रीजमध्ये ठेवलेले कणिक किंवा पीठ अनेकदा काळे होते आणि खूप कडक होते. या प्रकारच्या पिठापासून बनवलेली पोळी कडक आणि काळी असते. त्यामुळे बरेच लोक ताजे पीठ मळून घेतात. पण कधी कधी पीठ फ्रीजमध्ये ठेवलं तर या पद्धतींचा वापर करून तुम्ही ते मऊ करू शकता. यामुळे पोळ्या मऊ तर होतीलच पण पूर्ण पांढऱ्याही राहतील.
जर पीठ कडक आणि काळे झाले असेल तर ते पाण्यात टाकणे हा उत्तम उपाय आहे. फ्रीजमधून पीठ बाहेर काढा आणि कोमट पाण्यात घाला. साधारण अर्ध्या तासानंतर पीठ बाहेर काढून परत एकदा चांगले मळून घ्या. असे केल्याने पिठाचा कडकपणा निघून जाईल आणि पिठाचा काळेपणाही निघून जाईल.
जेव्हा पण पीठ फ्रीजमध्ये ठेवायचे असेल तर ते फूड सेड प्लास्टिक बॅगमध्ये ठेवा किंवा प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवा. यामुळे पीठ मऊ राहते. पीठ स्टीलच्या डब्यात ठेवल्यास पीठ लवकर सुकते आणि कडक होते. त्यामुळे ते प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवा.
जर तुम्ही फ्रिजमधून पीठ काढून लगेचच पोळी बनवली तर ती नेहमी काळी आणि कडक होईल. नेहमी पीठ बाहेर काढा आणि आधीच बाजूला ठेवा. ते खोलीच्या तापमानाला आल्यानंतरच त्याची पोळी बनवा. यामुळे पोळी मऊ होईल आणि पीठही थोडे मऊ होईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)