Tips to Choose Good Lychees: उन्हाळ्यात रसाळ फळे तोंडाला गोडवा तर देतातच पण शरीराला हायड्रेट ठेवतात आणि थंडावा देतात. असेच एक रसाळ फळ म्हणजे लिची. फोलेट, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६ यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक लिचीमध्ये असतात. हे व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते. पण चुकून बाजारातून रसायनांनी पिकवलेली लिची खरेदी करून घरी आणली की फक्त तुमची चव, पैसाच खराब होत नाही तर यामुळे तुमचे आरोग्य सुद्धा बिघडते. तुम्हाला तुमच्या चवीसोबत तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर लिची खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा. या टिप्स तुम्हाला फ्रेश आणि गोड लिची खरेदी करण्यासाठी मदत करतील.
ज्याचा आकार खूप मोठा आहे अशा लिची बाजारातून कधीही विकत घेऊ नका. जर लिची खूप मोठी असेल तर ती रसायनांच्या मदतीने पिकवली गेली असण्याची शक्यता असते.
ज्या लिचीची साल पांढरी किंवा खूप तपकिरी असते ती कधीही खरेदी करू नका. अशी लिची विकत घेतल्यास ती लवकर खराब होते. याशिवाय लिचीची साल तुटली असेल किंवा खूप ओली असेल तर ती सडू शकते, अशी लिची खाऊ नका. अशा प्रकारची लिची खाल्ल्याने पोटदुखी होऊ शकते.
कच्ची लिची खाल्ल्याने पोटदुखी होऊ शकते. त्यामुळे नेहमी पिकलेली लिची खावी. लिची ओळखण्यासाठी त्याच्या वरच्या भागाला स्पर्श करा. जर लिची बाहेरून खूप कडक असेल तर याचा अर्थ लिची कच्ची आहे.
हिरवी लिची कधीही खरेदी करू नका. या रंगाची लिची आतून पिकलेली नसते. नेहमी गुलाबी किंवा लाल रंगाची लिची खरेदी करण्याचा प्रयत्न करा.
लिची पिकलेली असेल तर तिचा वास गोड येतो. अन्यथा कच्च्या लिचीला आंबट वास येईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या