Trick to Clean Cylinder Rust Stains on Floor: स्वयंपाकघरात वापरले जाणारे गॅस सिलेंडर लोखंडाचे असतात. हा सिलेंडर किचनच्या फरशीवर बराच वेळ ठेवल्यास पाण्याच्या संपर्कात आल्याने फरशीच्या त्या भागात गंजचा डाग पडतो. हे खूप खराब दिसते. विशेषतः हलक्या रंगाच्या टाइल्स किंवा मार्बलवर ते अधिक वेगळे दिसून येते. कितीही घासलं तरी स्वच्छ होण्याचं नाव घेत नाही. आज आम्ही तुम्हाला हा हट्टी डाग सहज कसा साफ करायचा हे सांगणार आहोत. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही ते सहज साफ करू शकाल.
जमिनीवरील सिलेंडरच्या गंजाचे डाग लिंबाच्या रसाच्या साहाय्याने सहज दूर करता येतात. यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये लिंबाचा रस काढावा. आता लिंबाच्या रसात थोडी ब्लीच पावडर मिसळा. तयार मिश्रण एक मग पाण्यात मिक्स करा. आता हे पाणी डाग असलेल्या भागावर घाला. ब्रशच्या साहाय्याने डाग घासा. फरशी एकदम उजळून निघेल.
सिलेंडरचे गंजलेले डाग साफ करण्यासाठीही बेकिंग सोडा फायदेशीर ठरतो. बेकिंग सोड्याने डाग साफ करण्यासाठी सर्वप्रथम गरम पाण्यात बेकिंग सोडा मिसळून द्रावण तयार करा. आता ते स्प्रे बॉटलमध्ये भरून डाग असलेल्या जमिनीवर स्प्रे करा. आता हा डाग स्क्रबरने चोळून स्वच्छ करा. टाइल्सवरील डाग चांगल्या प्रकारे साफ केला जाईल.
व्हिनेगर आणि तुरटी वापरून जमिनीवरील हट्टी डाग दूर केले जाऊ शकतात. यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये व्हिनेगर लिक्विड घेऊन त्यात थोडी तुरटी मिसळून मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण डाग असलेल्या भागावर घाला आणि थोडा वेळ असेच राहू द्या. थोड्या वेळाने हलक्या हातांनी स्क्रबर चोळा, स्वच्छ पाण्याने फरशी धुवा. सर्व डाग सहज दूर होतील.
जमिनीवरील सिलेंडरचे हट्टी डाग काढण्यासाठी टूथपेस्ट आणि लिक्विड सोडा देखील वापरला जाऊ शकतो. यासाठी प्रथम एक चमचा लिक्विड सोडा, दोन चमचे टूथपेस्ट घालून चांगले मिक्स करा. आता हे मिश्रण डाग लागलेल्या भागावर लावून १० ते १५ मिनिटे राहू द्या. आता स्क्रबरने चोळून डाग काढून टाका. नंतर स्वच्छ ओल्या कापडाने नीट पुसून घ्या. फरशी पूर्णपणे स्वच्छ होईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या