Cooking Hacks: अंडी उकळतात फुटतात? फॉलो करा या टिप्स आणि ट्रिक्स
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cooking Hacks: अंडी उकळतात फुटतात? फॉलो करा या टिप्स आणि ट्रिक्स

Cooking Hacks: अंडी उकळतात फुटतात? फॉलो करा या टिप्स आणि ट्रिक्स

Oct 31, 2023 08:11 PM IST

Cooking Tips: बहुतांश लोक सकाळच्या नाश्त्यात उकळलेली अंडी खातात. पण अनेक वेळा अंडी उकळतात फुटतात. हे टाळण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

अंडी उकळण्यासाठी टिप्स
अंडी उकळण्यासाठी टिप्स (unsplash)

Egg Boiling Tips And Trciks: अंडा करी असो किंवा उकडलेली अंडी चाट खायची असेल दोन्ही गोष्टींसाठी अंडी चांगली उकळलेली असणे फार महत्वाचे आहे, नाहीतर जेवणाची चव आणि आनंद दोन्ही कमी होईल. पण अनेकदा घरातील स्त्रिया तक्रार करतात की अंडी उकळताना एकतर फुटतात किंवा त्यामध्ये भेगा पडतात. इतकेच नाही तर कधी अंडी सोलल्यावर फुटतात तर कधी आतून मऊ राहतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला अंडी उकळताना अशा समस्यांचा सामना करावा लागत असेल तर या टिप्स आणि ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही अंडी देखील योग्य पद्धतीने उकळू शकता. कसे ते पाहा

अंडी उकळताना लक्षात ठेवा या टिप्स

- अंडी उकळण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये पाणी गरम करा. अंडी उकळण्यासाठी अंडी बुडतील तेवढे पाणी पॅनमध्ये घाला. अंडी उकळताना लक्षात ठेवा की मोठे भांडे वापरा जेणेकरून अंडी उकळत असताना एकमेकांना लागून तुटणार नाही.

- पॅनमधील पाणी उकळल्यावर अर्धा चमचा मीठ घाला आणि हळूहळू सर्व अंडी घाला. अंडी उकळण्यासाठी गॅसची फ्लेम नेहमी मध्यम ठेवा. अंडी सुमारे १५ मिनिटे उकळल्यानंतर गॅस बंद करा. त्यांना गरम पाण्यातून बाहेर काढा आणि थंड पाण्यात घाला. १० मिनिटांनंतर अंडी पाण्यातून बाहेर काढा आणि सोलून घ्या. असे केल्याने अंडी सहजपणे त्याचे कवच सोडते.

- चांगले उकळलेल्या अंड्याचे वैशिष्ट्य म्हणजे अंड्याचा मध्यभाग चमकदार असतो. जर अंड्याच्या मध्यभागाचा रंग आजूबाजूच्या भागापेक्षा हिरवा असेल तर समजून घ्या की अंडी जास्त उकळली आहेत.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner