Kitchen Hacks: स्टीलच्या पॅन, कढईला अन्न चिकटते का? जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत-kitchen hacks how to stop food sticking in steel pan or kadhai follow these tips to use steel utensils ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kitchen Hacks: स्टीलच्या पॅन, कढईला अन्न चिकटते का? जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

Kitchen Hacks: स्टीलच्या पॅन, कढईला अन्न चिकटते का? जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

Aug 04, 2024 10:56 PM IST

Kitchen Tips in Marathi: घरात नॉनस्टिक ऐवजी स्टीलचे पॅन आणि कढई वापरता, पण त्याला सर्व पदार्थ चिकटले असतील तर स्टील पॅन नॉनस्टिकी बनवण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या.

स्टीलच्या भांड्याला अन्न चिकटण्यापासून टाळण्यासाठी टिप्स
स्टीलच्या भांड्याला अन्न चिकटण्यापासून टाळण्यासाठी टिप्स (unsplash)

Tips to Use Steel Utensils: आजकाल बहुतेक घरांमध्ये स्वयंपाकासाठी नॉनस्टिक तवा, पॅन आणि कढई वापरले जातात. परंतु अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की दररोज या नॉनस्टिक भांड्यांचा वापर केल्याने आपण आजारी पडू शकता. नॉनस्टिक भांड्यांमध्ये शिजवलेले अन्न कर्करोगास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे नॉनस्टिक वगळता लोखंड किंवा स्टील सारख्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करणे चांगले असते. पण स्टीलच्या कढईत किंवा पॅनमध्ये एखादी गोष्ट शिजवण्यासाठी ठेवली की ती तळाशी चिकटते. जर तुमच्याबाबतीत असे वारंवार घडत असेल तर जाणून घ्या स्टीलच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याच्या टिप्स. याच्या मदतीने अन्न चिकटणार नाही.

स्टीलच्या कढई किंवा पॅनचे तापमान योग्य असावे

स्टीलच्या कढईत किंवा पॅनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी एखादी वस्तू ठेवत असाल तेव्हा भांडी व्यवस्थित गरम झाली आहे की नाही यावर लक्ष ठेवा. भांड्याची उष्णता इतकी असावी की ती जास्त जळत नाही किंवा गरम ही कमी होत नाही. नाहीतर तेल घालताच त्यातून ओलावा बाहेर पडून तळाशी येईल आणि अन्न चिकटून राहिल. आता स्टीलच्या भांड्याचे तापमान योग्य आहे की नाही हे कसे जाणून घ्यायचे हा प्रश्न आहे. हे तापमान शोधण्याचे दोन मार्ग आहेत.

- स्टील पॅन चांगले गरम झाल्यावर त्यावर पाण्याचे काही थेंब घालावे. जर मोठ्या आवाजाने पाणी जळत असेल तर याचा अर्थ असा होतो की पॅन खूप गरम झाला आहे.

- दुसरीकडे पॅनमध्ये पाणी तरंगत असेल तर याचा अर्थ पॅन कमी गरम आहे.

- स्टीलचे भांडे योग्य तापमानावर तापवले तर पाण्याचे काही थेंब टाकल्यानंतर ते मोत्याप्रमाणे इकडे तिकडे तरंगत राहील. अशा प्रकारे पाणी तरंगत असताना स्टील पॅन किंवा कढईचे तापमान अगदी बरोबर आहे हे समजून घ्या. आता या तापमानावर त्यात तेल किंवा स्वयंपाकाचे साहित्य घालावे.

- स्टील पॅन किंवा कढईची उष्णता लोणीद्वारे सुद्धा तपासता येते. पॅन चांगले गरम झाल्यावर त्यावर लोणी घालावे. लोणी थोडे वितळले आणि उरलेले हळूहळू झाले तर याचा अर्थ स्टील पॅन, कढईचे तापमान परफेक्ट आहे.

स्टीलच्या भांड्यांना अन्न चिकटण्यापासून कसे टाळावे

आता स्टीलच्या कढईची किंवा पॅनची उष्णता कळली की त्यावर थोडे तेल लावून कापडाने पुसून घ्यावे. पुन्हा एकदा पाणी शिंपडावे. जेव्हा हे ठिपके मोत्यासारखे आजूबाजूला पसरू लागतात तेव्हा पुन्हा थोडे तेल लावावे. तयार आहे स्टीलची भांडी. हे आता भाज्या बनवण्यासाठी किंवा ऑमलेट बनवताना आरामात वापरता येते. याला काहीही चिकटणार नाही.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)