Tips To Buy Green Vegetables During Monsoon: पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी हिरव्या भाज्या खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण पालेभाज्या सहसा दलदलीच्या ठिकाणी वाढतात, जे अनेक प्रकारचे बॅक्टेरिया, विषाणू, बुरशी, कीटक आणि इतर रोग निर्माण करणारे जीवांच्या वाढीस अनुकूल असतात. उन्हाळ्यात सूर्यप्रकाशामुळे माती निर्जंतुकीकरण होण्यास मदत होते परंतु पावसाळ्यात सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे पानांना संसर्ग होण्याची शक्यता वाढते. अशावेळी निरोगी राहण्यासाठी हिरव्या पालेभाज्या नीट स्वच्छ तर कराव्यातच पण त्यांची योग्य खरेदीही करणं गरजेचं आहे. जाणून घेऊया पावसाळ्यात हिरव्या भाज्या खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात.
चांगले पालक विकत घेण्यासाठी सर्वप्रथम त्याच्या रंगाकडे लक्ष द्यावे. डार्क हिरवा पालक कधीही खरेदी करू नका. अशा पालकामध्ये रंगाची भेसळ केली जाते. ज्यामुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते. पालकाचा रंग नेहमी हिरवा आणि पिवळा मिक्स असावा.
कधीही जास्त जड फ्लॉवर खरेदी करू नका. वजनदार फुलकोबी बहुतेक वेळा आतून खराब निघते. नेहमी बाजारातून हलकी आणि सामान्य आकाराची फुलकोबी खरेदी करा.
बाजारातून कधीही लहान पानांची अरबीची पाने खरेदी करू नका. नेहमी बाजारातून मध्यम किंवा मोठ्या आकाराची अरबी पाने खरेदी करा. कारण लहान पानांमध्ये कीटक दिसत नाहीत, तसेच भाज्या कापण्यास त्रास होतो.
पुदिना खरेदी करण्यापूर्वी आधी पुदिन्याची पाने नेहमी तपासून घ्या. पुदिन्याच्या पानांमध्ये किंवा मुडलेल्या पानांमध्ये काही खुणा असतील तर असा पुदिना खरेदी करणे टाळावे. पुदिन्याची अशी पाने रोगाचे लक्षण असू शकतात. नेहमी बाजारातून स्वच्छ आणि दाट पानांचा पुदिना खरेदी करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या