मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kiss Day 2024: प्रत्येक किसचा असतो वेगळा अर्थ, पाहा शरीरावर कुठे किस केल्याचा काय असतो मॅसेज

Kiss Day 2024: प्रत्येक किसचा असतो वेगळा अर्थ, पाहा शरीरावर कुठे किस केल्याचा काय असतो मॅसेज

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 13, 2024 11:17 AM IST

Kiss Day Special: व्हॅलेंटाईन वीकमध्ये १३ फेब्रुवारीला किस डे साजरा होत आहे. तुम्हाला किसचे विविध प्रकार आणि त्याचे अर्थ माहीत आहेत का? इथे जाणून घ्या.

किसचे प्रकार आणि त्याचे अर्थ
किसचे प्रकार आणि त्याचे अर्थ (unsplash)

Types of Kisses With Their Meaning: प्रेम व्यक्त करण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे किस. याच कारणामुळे व्हॅलेंटाईन वीकमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या एक दिवस आधी म्हणजेच १३ फेब्रुवारीला किस डे साजरा केला जातो. किस म्हणजे फक्त प्रेम व्यक्त करणेच नाही तर आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन देखील मानले जाते. तुम्हाला माहीत आहे का की किस फक्त एक प्रकारचा नाही तर त्याचे अनेक प्रकार आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक किसचा स्वतःचा वेगळा अर्थ असतो. चला जाणून घेऊया किसचे किती प्रकार आहेत, तसेच पार्टनरने कुठे किस केले यावरून त्याच्या मानातील भाव, त्याचा अर्थ काय होतो.

फोरहेड किस

कपाळावर किस करणे हे प्रेम व्यक्त करण्याचा सर्वात पवित्र मार्ग मानला जातो. हे तुमच्या नात्याबद्दलची असुरक्षितता आणि चिंतेची भावना काढून टाकते. यामुळे तुम्हाला नात्यात आपुलकी आणि सुरक्षितता जाणवते.

चिक किस

लहान मूल असो किंवा तुमची गर्लफ्रेंड, गालावर किस करणे म्हणजे प्रेम आणि आपुलकी व्यक्त करणे होय. हे तुमच्या दोघांमधील आपुलकी आणि परस्पर संबंध दर्शवते. याचा सरळ अर्थ असा आहे की त्याला वाटते की तुम्ही प्रेमळ, क्यूट आणि सुंदर आहात.

हँड किस

हातावर किस कधीकधी एखाद्या व्यक्तीची प्रशंसा करण्यासाठी केले जाते. कधीकधी कोणीतरी त्याच्या/तिच्या चांगल्या भावना व्यक्त करण्यासाठी हातावर किस करते. याचा अर्थ असा होतो की समोरची व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित झाली आहे आणि ती तुम्हाला डेट करायचे आहे.

इअरलोब किस

कानावर चुंबन घेण्याला इअरलोब किस म्हणतात. हे चुंबन रोमँटिक चुंबन मानले जाते. अशा प्रकारचे किस करून प्रेमी आपल्या पार्टनरला रोमान्सची अनुभूती देतात.

 

लिप किस

ओठांवर चुंबन आकर्षण आणि इंटेमेसी दर्शवते. जर तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्याच्या प्रेमात असाल तर हे किस केले जाते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel