Benefits of Kissing Your Partner: प्रेम व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. आपल्या जोडीदाराला मिठी मारणे आणि किस करणे हा त्यापैकी एक मार्ग आहे. सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. प्रेमाच्या या आठवड्यात रोज वेगवेगळे दिवस साजरे करून प्रेम व्यक्त केले जाते. हग डे नंतर साजरा केला जाणारा दिवस म्हणजे किस डे. १३ फेब्रुवारीला किस डे साजरा केला जातो. यावेळी लव्हर्स एकमेकांना किस करतात. हे केवळ प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग नाही तर किस केल्याने आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. किस केल्याने शरीरात हॅपी हार्मोन्स बूस्ट होतात. ज्यामुळे अनेक आजारांपासून दूर राहता येते. जाणून घ्या किस करण्याचे आश्चर्यकारक फायदे.
१. किस केल्याने हृदयाच्या समस्या दूर होतात. जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरला किस करता तेव्हा शरीरात एड्रेनालिन नावाचा हार्मोन तयार होतो, जो हृदयासाठी खूप चांगला असतो.
२. अहवालात असे म्हटले आहे की किस केल्याने व्यक्तीचा ताण कमी होतो. अभ्यासातनुसार जेव्हा एखादी व्यक्ती दीर्घकाळ किस करते तेव्हा त्यामुळे तणावाची पातळी कमी होते.
३. किस केल्याने लठ्ठपणा कमी होतो असे म्हटले जाते. कारण चुंबन घेताना कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे चयापचय दर देखील वाढू शकतो.
४. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी किस बीपी नियंत्रित करण्यास मदत करू शकते. रिपोर्ट्स सांगतात की किस केल्याने रक्त प्रवाह सुधारतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.
५. रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की किस केल्याने पुरुषांचे आयुष्य वाढते. अभ्यासानुसार असे स्पष्ट केले आहे की किस न करणाऱ्या लोकांच्या तुलनेत किस करणाऱ्या लोकांचे वय ५ वर्षांनी वाढू शकते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)