Why Children Fall Sick More Frequently: लहान मुलांची खूप काळजी घ्यावी लागते. मात्र काही पालकांना त्यांची मुले वारंवार आजारी पडण्याची भीती वाटते. पण असं का होतं माहीत आहे का? वास्तविक जेव्हा मुलाची प्रतिकारशक्ती कमकुवत असते तेव्हा असे होते. यासोबतच काही चुकांमुळे सुद्धा मुले आजारी पडू शकतात. येथे जाणून घ्या
जंतू सर्वत्र असतात. ते खेळाच्या मैदानासह मुलांच्या खेळण्यांमध्ये आढळतात. अशा परिस्थितीत मुले जंतूंना लवकर बळी पडतात. त्यामुळे ते पुन्हा पुन्हा आजारी पडू शकतात. आजार टाळण्यासाठी मुलांना स्वच्छता राखण्यास शिकवा. जसे की वेळोवेळी हात धुणे, दात घासणे आणि नखे कापणे.
पिझ्झा, बर्गर, कोला यासारख्या गोष्टी मुलांना आवडतात. पण त्यांना समजावून सांगावे लागेल की अशा गोष्टी रोज खाल्ल्याने त्यांचे पचन बिघडते आणि त्यांची प्रतिकारशक्तीही कमकुवत होते. जर तुम्हाला तुमच्या मुलाला निरोगी ठेवायचे असेल तर त्याला हेल्दी आणि ताजे अन्न खायला द्या. मुलांना दररोज फळे आणि भाज्या खायला द्या.
प्रौढ व्यक्ती रात्री ६-७ तास झोपल्यानंतरही सकाळी फ्रेश उठू शकतात. पण मुलांच्या बाबतीत असे होत नाही. मुलांना किमान १० ते १४ तासांची झोप आवश्यक असते. हे मुलांच्या वयावर देखील अवलंबून असते. मुलांना पुरेशी झोप न मिळाल्यास शारीरिक ताणही येऊ शकतो. त्यामुळे रोगप्रतिकार शक्तीही कमकुवत होऊ शकते.
आजकाल मुले मोबाईल फोन आणि टीव्हीकडे जास्त लक्ष देतात आणि बाहेर खेळणे सोडून देतात. जर तुम्हाला तुमच्या मुलाला आजारी पडण्यापासून वाचवायचे असेल तर त्याला पार्क, मैदानात जाऊन खेळण्यास प्रवृत्त करा. कमी सक्रिय असलेल्या मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत असू शकते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या