मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kids Health Care: थंडीत मुलांना असतो न्यूमोनियाचा धोका, प्रतिबंधासाठी काय सांगतात एक्सपर्ट?

Kids Health Care: थंडीत मुलांना असतो न्यूमोनियाचा धोका, प्रतिबंधासाठी काय सांगतात एक्सपर्ट?

Feb 01, 2023 11:05 PM IST

Pneumonia in Children: हवामानातील बदल आणि तापमानातील चढउतारामुळे मुलांमध्ये न्यूमोनिया आणि श्वासोच्छवासाच्या समस्या वाढल्या आहेत. या समस्येपासून मुलांना वाचवण्यासाठी तुम्ही काही पद्धतींचा अवलंब करु शकता.

मुलांना न्यूमोनियापासून वाचवण्यासाठी उपाय
मुलांना न्यूमोनियापासून वाचवण्यासाठी उपाय (unsplash)

Tips to Prevent Child from Pneumonia: कडाक्याच्या थंडीत मोठी माणसे आणि मुले दोघेही त्रस्त झाले आहेत. हा थंडीचा ऋतू अनेक आजार घेऊन येतो. जर आपण लहान मुलांबद्दल बोललो तर त्यांना या हंगामात न्यूमोनिया होण्याचा धोका असतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तापमानात होणारी घट आणि प्रदूषणाचा दुहेरी त्रास लहान मुलांवरही होत आहे. अशा परिस्थितीत थंडीत मुलांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ही लक्षणे दिसून येतात

न्यूमोनिया असलेल्या काही मुलांना खोकला आणि सौम्य ताप येतो. त्याचबरोबर काही मुले अशी आहेत ज्यांचे खाणे-पिणे कमी झाले आहे आणि श्वास घेण्यासही त्रास होतो. एम्सच्या बालरोग विभागाचे डॉ. एस. काबरा यांनी मुलांना थंडीपासून वाचवायला हवे, असे सांगितले. जलद श्वास घेणे, छातीत घरघर येणे इत्यादी देखील मुलांमध्ये न्यूमोनियाची लक्षणे असू शकतात. यामध्ये बहुतेक पाच वर्षांखालील मुलांना श्वास घेण्यास त्रास होतो.

लसीकरण करा

दिल्लीच्या चाचा नेहरू हॉस्पिटलमधील बालरोगतज्ञ डॉ. याचिका वशिष्ठ यांनी सांगितले की, न्यूमोनियापासून बचाव करण्यासाठी अनेक लसी उपलब्ध आहेत, ज्यामुळे मुलांना हा संसर्ग टाळता येऊ शकतो. या संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी फ्लूची लस उपयुक्त ठरू शकते. बालकांच्या लसीकरणासोबतच पालकांनी घरातील प्रदूषण टाळावे आणि न्यूमोनियापासून बचावात्मक उपाययोजना करत राहावे, असे त्यांनी सांगितले.

अशा प्रकारे मजबूत करा इम्यूनिटी

डॉ. नीतू जैन, श्वसन तज्ज्ञ यांच्या मते, मुलांनी आपले हात साबण आणि पाण्याने किमान २० सेकंद नियमितपणे धुवावेत. शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी निरोगी जीवनशैलीचे अनुसरण करा. पुरेशी विश्रांती घ्या, संतुलित आहार घ्या.

असे पडतात आजारी

जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकते, शिंकते किंवा बोलतो तेव्हा थेंब हवेत पसरतात. परिणामी जेव्हा इतर लोक श्वास घेतात तेव्हा त्यांना संसर्ग होऊ शकतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या